भारतात दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव हा भक्ती आणि आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे.. नवरात्रीत मुळे भक्तांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि भक्तीचा संचार करतो. नवरात्र म्हंटले की देवीची घटस्थापना करण्यात येते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात. तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. अशावेळी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Ghatasthapana Shubh Muhurt)काय आहे हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचे आहे.
काय आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त? Ghatasthapana Shubh Muhurt
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सोमवार 22 सप्टेंबर 2025सकाळी : 6.09 वाजेपासून ते सकाळी 8.06 वाजेपर्यंतअभिजित मुहूर्त : सकाळी 11.49 वाजेपासून ते दुपारी 12.38 वाजेपर्यंतयाकाळात तुम्ही घटस्थापना करू शकता.
कशाप्रकारे बसवावा देवीचा घट ?
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, सकाळी शुभ वेळी घटस्थापना करा. प्रथम, पूजास्थळ स्वच्छ करा. तेथे लाल किंवा पिवळा कापड पसरवा, माती किंवा वाळू घाला आणि जव किंवा गहू पेरा. हे बिया समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. Ghatasthapana Shubh Muhurt
कलश तयार करणे
कलश तयार करण्यासाठी मातीचा किंवा तांब्याचा कलश घ्या. त्यात गंगाजल किंवा शुद्ध पाणी भरा. अक्षदा, सुपारी, नाणे, दुर्वा (सूर्यफूल) आणि फुले पाण्यात घाला. कलशाच्या बाहेर स्वस्तिक काढा आणि त्याला पवित्र धाग्याने बांधा. कलशाच्या वरच्या बाजूला पाच किंवा सात आंब्याची पाने ठेवा. वर लाल कापडात गुंडाळलेला नारळ ठेवा. कारण हा नारळ देवी शक्तीचे प्रतीक आहे. Ghatasthapana Shubh Muhurt
घरात कलश बसवल्यानंतर, संपूर्ण नऊ दिवस घर रिकामे ठेवू नये. कलशात दुर्गा देवीची शक्ती असते. ती दुर्लक्षित ठेवणे अशुभ मानले जाते. घरात सतत भक्तीचे वातावरण राखणे ही पूजेची यशाची गुरुकिल्ली आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






