MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Guru Purnima Wishes :’ज्यांनी मला घडवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!’ गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या खास शुभेच्छा…

Published:
guru purnima 2025 : यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही देखील तुमच्या गुरुंना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता तसेच दिवसाचा आनंद द्विगुणित करु शकता.
Guru Purnima Wishes :’ज्यांनी मला घडवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!’ गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या खास शुभेच्छा…

आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही आषाढ पौर्णिमा गुरूपौर्णिमा (guru purnima 2025) किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. पौराणिक मान्यतेनुसार सुमारे 3000 वर्षांपूर्वी वेद व्यासमुनींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा 10 जुलैला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही देखील तुमच्या गुरुंना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता तसेच दिवसाचा आनंद द्विगुणित करु शकता…

आपल्या गुरूंना द्या गुरुपौर्णिमेच्या खास शुभेच्छा…

  • गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
    गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ।।
    गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !
  • गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम
    आणि अखंड वाहणारा झरा…
    गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य…
    गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती…
    गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य…
    गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक…
    आजपर्यंत कळत नकळत पणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना…
    आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
    गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

  • गुरुशिवाय ज्ञान नाही,
    ज्ञानाशिवाय आत्मा नाही
    ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
    सर्वकाही गुरूंचीच देन
    माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

 

  • ज्यांनी मला घडवलं या
    जगात लढायला जगायला शिकवलं
    अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे
    गुरुपौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

 

  • गुरु म्हणजे आदर्श…
    गुरु म्हणजे प्रमानतेची मुर्तिमंत प्रतिक
    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

गुरुपौर्णिमेला आपल्या आई-वडिलांना पाठवा खास मराठी शुभेच्छा

  • आई असते गुरुचे रुप,
    बाबा असतात मायेची सावली,
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!

 

  • गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ
    आई-बाबा आहात तुम्ही माझे
    पण आहात खरे गुरु या आयुष्याचे

 

  • स्वत:चा विचार न करता
    माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!

 

  • ज्यांनी मला घडवलं,
    या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
    मला भाग्यवंत समाधानी केलं..
    असे माझे आई वडील, गुरुजन, नातेवाईक आणि ऊर्जादायी मित्र यांचा मी ऋणी आहे..!