Marathi News

Jyeshtha Gauri Pujan 2025: गौरीच्या नैवेद्यासाठी कशी बनवायची अळूची वडी? पाहा पारंपरिक रेसिपी

Published:
गौरी आगमना दिवशी साधा भाजी भाकरीचा पण अत्यंत चविष्ट नैवेद्य असतो. यादिवशी अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात.
Jyeshtha Gauri Pujan 2025: गौरीच्या नैवेद्यासाठी कशी बनवायची अळूची वडी? पाहा पारंपरिक रेसिपी

Gauri Naivedya Recipes:  गणेशेत्सवात पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आवर्जून पाहायला मिळतात. गणपती बाप्पासाठी मोदकाचा खास नैवेद्य असतो. त्याचप्रमाणे गौराईसाठीही खास देवीच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात. श्रीगणेश आगमनानंतर देवी गौराईचे घरात आगमन होते. प्रत्येक मराठमोळ्या घरात ही एक अत्यंत महत्वाची प्रथा आहे.

गौरी आगमना दिवशी साधा भाजी भाकरीचा  पण अत्यंत चविष्ट नैवेद्य असतो. यादिवशी अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. यामध्ये खासकरून अळू वडीचा समावेश असतो. अळू वडी प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये नेहमीच पाहायला मिळते. गौराईच्या नैवेद्यातसुद्धा अळूच्या वडीचा विशेष मान आहे. ज्या महिलांना अळू वडी बनवणे कठीण जाते त्यांना ही रेसिपी फायदेशीर ठरू शकते.

 

अळू वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

अळूची पाने- ८ ते १०

बेसन –   ६ ते ७ चमचे

तांदळाचे पीठ- ४ ते ५ चमचे

तिखट- १ चमचा

तीळ-  २ चमचे

हळद- १ चमचा

मीठ- चवीनुसार

गोडा मसाला- चवीसाठी

तेल- १ वाटी

चिंच आणि गुळाचा कोळ- इच्छेनुसार

कोथिंबीर- बारीक चिरून

 

अळूची वडी बनवण्याची पारंपरिक रेसिपी-

 

अळूची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या. आता त्याचे देठ हळुवार काढून पान एकसारखे करून घ्या.

त्यांनंतर एका भांड्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि गोडा मसाला घालून एक चांगले मिश्रण बनवून घ्या. त्यामध्ये गाठी होऊ देऊ नका.

आता एक अळूचे पान घेऊन त्यावर बेसनाचे मिश्रण चांगले लावून घ्या. नंतर आणखी एक पान ठेऊन त्यावर बेसन लावून घ्या.

आता या पानांची गोलाकार सुरळी करा आणि वाफवून घ्या.

नंतर वाफलेल्या पानांचे काप पाडून घ्या आणि आता तेलात चांगले परतून फोडणी द्या.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews