भगवान शिव यांना कसा मिळाला तिसरा डोळा, जाणून घ्या रहस्यमय कहाणी

Published:
महादेव त्रीनेत्रधारी किंवा त्रीलोचन म्हणून ओळखले जातात. तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्वकाही पाहू शकतो, असं म्हटलं जातं.
भगवान शिव यांना कसा मिळाला तिसरा डोळा,  जाणून घ्या रहस्यमय कहाणी

भक्त देवांचे देव महादेव यांची मोठ्या भक्तीने पूजा करतात. हिंदू धर्मात भगवान शिवाचे खूप महत्त्व आहे. त्यांना त्रिलोचन म्हणूनही ओळखले जाते, जे शक्ती आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. भगवान शंकराचा तिसरा डोळा (त्रिनेत्र) कसा जन्माला आला, याबद्दल अनेक कथा आणि मान्यता आहेत. आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्याच्या उत्पत्तीबद्दलच्या पौराणिक कथा सांगणार आहोत, ज्यांचे वर्णन शिवपुराणात देखील केले आहे. भोलेनाथाच्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य जाणून घेऊया.

पौराणिक कथा

एकदा पार्वती मातेने गंमतीने भगवान शंकराचे डोळे बंद केले, ज्याचा प्रभाव संपूर्ण जगावर दिसून आला. त्यामुळे संपूर्ण विश्व अंधारात बुडून गेले. सर्व प्राणी, वनस्पती आणि देवता भयभीत झाले. शंकरांना पार्वतीची ही खोड आवडली नाही आणि त्यांनी क्रोधित होऊन आपल्या कपाळावर तिसरा डोळा उघडला. या डोळ्यातून निघालेल्या तेजाने सर्वत्र प्रकाश पसरला आणि जगाला पुन्हा प्रकाश मिळाला. 

तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व

शंकराचा हा तिसरा डोळा ज्ञान, चेतना आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. या डोळ्याद्वारे शिव भूत, भविष्य आणि वर्तमानकाळ पाहू शकतात. तिसरा डोळा उघडणे म्हणजे विध्वंस आणि नवीन निर्मितीची सुरुवात. हे परिवर्तन आणि बदलाचे प्रतीक आहे. तिसरा डोळा वाईट शक्ती आणि नकारात्मक विचारांचा नाश करतो. जेव्हा भगवान शिव क्रोधित होतात, तेव्हा ते तिसरा डोळा उघडतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews