Vastu Shastra Tips Marathi: हिंदू धर्मामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. हे फुल सूर्योदय आणि सूर्यास्ताचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि विष्णूदेव यांना झेंडूचे फुल अत्यंत प्रिय आहे. वास्तू शास्त्रानुसार झेंडूचे रोप सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तसेच या फुलांचा पूजेमध्ये आवर्जून वापर केला जातो. आज आपण झेंडूच्या फुलांचे महत्व, ते रोप लावण्याची योग्य दिशा आणि स्थान याबाबत जाणून घेऊया…
झेंडूच्या फुलांचे धार्मिक महत्व-
प्राचीन काळापासून पूजेमध्ये झेंडूच्या फुलांचा वापर केला जात आहे. या फुलांचा सुंगध नवचैतन्य निर्माण करते. त्यामुळेच देवी लक्ष्मी आणि विष्णूदेवाला हे फुल फार आवडते. पूजेच्या थाळीमध्ये झेंडूच्या फुलांची माळ करून ठेवल्यास देवी-देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या फुलांमुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
झेंडूच्या फुलांचे वास्तू लाभ-
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये झेंडूचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तसेच हे रोप घरामध्ये सुखसमृद्धी, आर्थिक लाभ आणि प्रगतीचे नवीन मार्ग घेऊन येते. झेंडूचे फुल नियमितपणे पूजेत वापरल्यास देवी लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त होते.
झेंडूचे रोप लावण्याची योग्य दिशा-
वास्तू शास्त्रानुसार झेंडूचे रोप ईशान्य कोनात म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेत लावणे अतिशय चांगले असते. कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे. तसेच पूर्व-उत्तर दिशासुद्धा उत्तम असते. झेंडूचे रोप योग्य दिशेत लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते.
झेंडूचे रोप ‘या’ ठिकाणी लावणेही असते चांगले-
वास्तू शास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाजवळ झेंडूचे रोप लावणे अत्यंत चांगले असते. ते रोप नकारात्मक उर्जेला घरात प्रवेश करण्यास रोखते. तसेच मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधणेसुद्धा चांगले असते. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते.
अशी घ्या झेंडूच्या रोपाची काळजी-
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये लावलेले झेंडूचे रोप नेहमी हिरवेगार असावे. हे रोप कुजलेले किंवा वाळलेले असू नये. हिरवेगार रोप घरात सुखसमृद्धी घेऊन येते. त्यामुळे वेळोवेळी रोपाची योग्य ती काळजी घ्या. नियमित रोपाला आवश्यक पाणी द्या. शिवाय वाळलेल्या फुलांना नदीमध्ये विसर्जित करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





