Marathi News

तुमचं मन सतत बैचेन होतंय? प्रेमानंद महाराजांनी दिला हा सल्ला

Published:
आजकाल माणसाचे जीवन इतके बदललेले आहे आणि धावपळीचे झाले आहे की अनेकदा माणसाला दबावाची भावना मनात निर्माण होतें.
तुमचं मन सतत बैचेन होतंय? प्रेमानंद महाराजांनी दिला हा सल्ला

आजकाल माणसाचे जीवन इतके बदललेले आहे आणि धावपळीचे झाले आहे की अनेकदा माणसाला दबावाची भावना मनात निर्माण होतें. कधी हा दबाव मानसिक असतो तर कधी शारीरिक असतो. परंतु या दबावामुळे माणसाचे मन मात्र बैचेन होते. मनात अस्वस्थता निर्माण होते. अशावेळी नेमकं काय करावं हेच कोणाला सुचत नाही. तुमच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसे घडत असेल तर चिंता करू नका. अशावेळी मनाला स्थिर ठेवण्यासाठी नेमके काय करावे?? त्याचे उपाय प्रेमानंद महाराजांनी सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

१) इतरांना क्षमा करायला शिका

जर तुम्हाला तुमचे मन अगदी शांत करायचे असेल, तर तुम्ही इतरांना क्षमा करायला शिका. तुमचे मन शांत ठेवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. इतरांना क्षमा केल्याने तुमच्या मनात शांती येईल. आणि मनातील अस्वस्थता जाईल.

२) देवाच्या नावाचा जप करा

जर तुम्हाला तुमचे मन शांत करायचे असेल आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर तुम्ही देवाच्या नावाचा जप करू शकता. यामुळे तुम्हाला खूप शांती मिळेल आणि तुमचे मन कधीही भटकणार नाही. देवाच्या नावाचा सातत्याने जप केल्याने मनात आत्मविश्वास सुद्धा वाढेल. आणि तुमच्या मनातील अस्वस्थता एका क्षणात दूर होईल.

३) पैशाचा योग्य वापर

तुम्हाला नेहमीच तुमचे पैसे चांगल्या प्रकारे कसे वापरायचे हे माहित असले पाहिजे. जर तुम्ही जोशात नको त्या ठिकाणी पैसे खर्च केले तर काही वेळानंतर तुम्हाला त्याची जाणीव होते आणि तुमचं मन त्यानंतर अस्वस्थ होते. एकदा गेलेला पैसा परत मागे येत नाही. त्यामुळे हि चूक करू नका.

४) इतरांना मदत करणे

जर तुम्ही इतरांना मदत केली तर देव स्वतः तुम्हाला मदत करतो. तुमचे मन नेहमी शांत ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी इतरांना मदत केली पाहिजे. दुसर्यांना मदत केलेली कधीही वाया जात नाही. उलट तुमच्या सोबत आणखी चार हात उभे राहतील.

५) कर्तव्य आणि धर्माचे पालन

तुमचे मन शांत ठेवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी, तुम्ही नेहमी तुमचे कर्तव्य आणि धर्माचे पालन केलं पाहिजे. तुम्ही जर सत्य आणि न्यायाच्या सोबत असाल तर कधीही तुमचं मन अस्वस्थ राहणार नाही. उलट तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटत राहील.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews