kojagiri purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेला बनवा सँडविच सर्वांच्याच जीभेवर रेंगाळेल चव

Published:
कोजागिरी पौर्णिमेसाठी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने चविष्ट व्हेज सँडविच बनवू शकता.
kojagiri purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेला बनवा सँडविच सर्वांच्याच जीभेवर रेंगाळेल चव

कोजागरी पौर्णिमेला चंद्राचे प्रतिबिंब पाहून आपण दूध पितो. कोजागरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा देशभरात अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. यादिवशी आवर्जून मसाला दूध केले जाते. पण त्यासोबत जेवायला काय करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पाहूया कोजागरीला करता येईल असा पदार्थ..

साहित्य

  • ब्रेडचे स्लाइस
  • उकडलेले बटाटे (मॅश केलेले)
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेला टोमॅटो
  • बारीक चिरलेली सिमला मिरची
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • जिरे पावडर
  • धणे पावडर
  • गरम मसाला
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • चीज (किसलेले)
  • तेल किंवा बटर

कृती

  • एका भांड्यात उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर आणि सर्व मसाले, मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • ब्रेडच्या दोन स्लाइस घ्या. एका स्लाइसवर तयार केलेले बटाट्याचे सारण पसरा. त्यावर किसलेले चीज घाला.
  • सारणावर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवा.
  • गरम तव्यावर थोडे तेल किंवा बटर घालून सँडविच ठेवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि चीज वितळेपर्यंत भाजून घ्या.
  • गरमागरम सँडविच कट करून टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टीप

तुम्ही या सँडविचमध्ये तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या, पनीर किंवा उकडलेले शेंगदाणे देखील घालू शकता. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हे सँडविच चवीला खूपच छान लागतील.