Navanna Purnima 2025 : नवान्न पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व

Published:
कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी आणि चंद्राची पुजा महत्त्वाची मानली जाते, त्यासाठी जाणून घ्या विधी आणि मुहूर्त!
Navanna Purnima 2025 : नवान्न पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व

नवान्न पौर्णिमा ही आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच साजरी केली जाते. नवान्न पौर्णिमेला अन्नधान्याची समृद्धी राहावी यासाठी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी प्रार्थना करावी. या दिवशी नवीन धान्याचे पूजन केले जाते.

नवान्न पौर्णिमा का साजरी करतात?

नवान्न पौर्णिमा हा सण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केला जातो, खासकरून कोकणात, जिथे शेतकरी वर्ग भात पिकाची नवीन पीक म्हणून तयारी झाल्यानंतर हा सण साजरा करतात. नवान्न म्हणजे नवीन अन्न. नवीन अन्न वापरायला काढण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या दिवशी सर्व धान्य घरात आलेलं असतं, दिवाळीपूर्वी आठ दिवस आधी साजरा करतात. तेव्हा झोडपलेलं धान्य कणगीतर भरून ठेवलं जातं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नव्या तांदुळाची खीर नैवेद्य म्हणून करण्याचा प्रघात कोकणात आहे. दाराला नव्या कणिसाच्या लोम्ब्या लावून आंब्याच्या पानाचं तोरण घराघरात बांधलं जातं. प्रत्येक दाराला एक एक कणीस बांधलं जातं. शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा हा सण.

नवान्न पौर्णिमेचे महत्त्व

नवान्न पौर्णिमा म्हणजे नवीन धान्याची पौर्णिमा, जी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि नवीन पिकाचे स्वागत करते. या दिवशी धान्यलक्ष्मीचे स्वागत केले जाते. घराला नवीन धान्याचे तोरण लावून दारांमध्ये रांगोळ्या आणि दिवे लावले जातात. कोकणात या दिवशी घराघरात ‘नवे’ (धान्याचे भारे) बांधले जातात, जे नवीन धान्याच्या आगमनाचे प्रतीक आहे. या उत्सवामुळे घरात अन्न-धान्याची कमतरता भासू नये, अशी कामना केली जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews