Kojagiri Special Recipe : कोजागिरीला करा चमचमीत पावभाजीचा बेत; कोजागिरी होईल खास

Published:
Last Updated:
कोजागरी पौर्णिमेला मसाला दूधाची पार्टी करताना जर तुम्ही काही चमचमीत पदार्थ बनवण्याच्या विचारात असाल तर पावभाजी बनवू शकता.
Kojagiri Special Recipe : कोजागिरीला करा चमचमीत पावभाजीचा बेत; कोजागिरी होईल खास

कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते, धार्मिक मान्यतेनुसार, या विशेष दिवशी चंद्र दिसणे शुभ मानले जाते. एवढेच नाही तर या दिवशी नीट पाहिल्यास कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो. कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे मसाला दूध आणि तासनतास गप्पा. कोजागिरीला रात्रीचं जेवण काय स्पेशल बनवता येईल असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात असतो. यंदा कोजागिरी पौर्णिमेला घरच्या घरीच बनवा सोप्या पद्धतीने चविष्ट पावभाजीचा बेत, जाणून घ्या रेसिपी!

साहित्य

  • बटाटे
  • टोमॅटो
  • फुलकोबी
  • गाजर
  • मटार
  • शिमला मिरची
  • बटर
  • तेल
  • जिरे
  • आलं-लसूण पेस्ट
  • पावभाजी मसाला
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • पाणी
  • कोथिंबीर
  • लिंबू
  • कांदा

कृती

  • प्रेशर कुकरमध्ये बटाटे, टोमॅटो, फुलकोबी, गाजर, मटार आणि शिमला मिरची घेऊन त्यात थोडे पाणी, मीठ घालून ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
  • शिजलेल्या भाज्या पूर्णपणे मॅश करून एकजीव करा.
  • एका कढईत बटर आणि तेल गरम करा.
  • त्यात जिरे घाला आणि ते तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
  • आलं-लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परता.
  • बारीक चिरलेले टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजू द्या.
  • आता त्यात हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • शिजवलेल्या आणि मॅश केलेल्या भाज्या घालून भाजी व्यवस्थित एकत्र करा.
  • गरजेनुसार थोडे पाणी घालून भाजी मंद आचेवर शिजवा.
  • भाजी पुन्हा एकदा मॅश करा आणि चवीनुसार मीठ घाला.
  • एका तव्यावर बटर लावून पाव मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरमागरम पावभाजीवर बटर, बारीक चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि ताजी कोथिंबीर घालून लगेच सर्व्ह करा.