Laxmi Pujan Shubh Muhurt : लक्ष्मी पूजनासाठी फक्त अडीच तासाचा वेळ; चला जाणून घेऊया

Published:
Last Updated:
अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी संपणार आहे.
Laxmi Pujan Shubh Muhurt : लक्ष्मी पूजनासाठी फक्त अडीच तासाचा वेळ; चला जाणून घेऊया

सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू आहे. उद्या दिवाळीचा मुख्य दिवस असून दिवाळीच्या शुभ दिवशी लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. दरवर्षी दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा पाळली जाते. मात्र यंदाच्या दिवाळीत 20 आणि 21 ऑक्टोबर या दोन दिवशी अमावस्या असल्यानं पूजन (Laxmi Pujan Shubh Muhurt) करायचं कधी? असा प्रश्न अनेकांना पडलाय. ज्या रात्री अमावस्या असते त्या रात्री लक्ष्मीपूजन केलं जातं, मात्र यावेळी 20 तारखेच्या रात्री अमावस्या असली तरी 21 ऑक्टोबर रोजी पूजन केलं जाणार आहे. या पूजनाची शुभ वेळ काय आहे ते आपण जाणून घेऊया.

लक्ष्मीपूजन करण्यासाठी अडीच तासाचा वेळ : Laxmi Pujan Shubh Muhurt

अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी संपणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं योग्य आहे. यादिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेदरम्यान लक्ष्मीपूजन करू शकता. यंदा लक्ष्मीपूजन करण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ आहे. Laxmi Pujan Shubh Muhurt

असे करा लक्ष्मी पूजन?

सर्वात आधी गणपतीचे पूजन करून ‘ॐ गं गणपतये नमः’ मंत्र जपावा. त्यानंतर कलश आणि कुबेरादी देवतांचे पूजन करावे. मग महालक्ष्मीचे पूजन करावे. देवीला हळद, कुंकू, चंदन लावावे, कमळाचे किंवा शुभ्र फुले अर्पण करावीत आणि पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने स्नान घालावे. वस्त्र, आभूषण आणि गंध अर्पण करून धूप आणि दीप प्रज्वलित करावा. ‘ॐ महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा जप करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)