ज्या लोकांच्या कुंडलीत शनि (Lord Shani) अशुभ स्थितीत असतो, त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे लोक वेगवेगळे उपाय करत असतात. हिंदू धर्मानुसार शनिवारी शनिदेवाची (Lord Shani) पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी असेच काही खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शनि यंत्राची पूजा करा
शनिवारी शनि देवाशी संबंधित एक विशेष यंत्र आहे, ज्याला शनि यंत्र म्हणतात. ते शनि देवाच्या पूजेदरम्यान ठेवावे. या शनि यंत्राची पूजा केल्याने शनि देव प्रसन्न होतील आणि तुमच्या समस्या दूर होतील.
काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य
पूजेच्या एक दिवस आधी तीन भांड्यांमध्ये 1.25 किलो काळे हरभरे वेगळे भिजवा. दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर ते काळे हरभरे विधिनुसार शनिदेवाच्या पूजेत वापरावेत. पूजेनंतर प्रथम काही हरभरे म्हशीला खायला द्यावेत. उर्वरित कुष्ठरुग्णांना वाटण्यात यावे. त्याचबरोबर काही हरभरे घरापासून दूर अशा ठिकाणी ठेवावे ज्या ठिकाणी कोण येत जात नाही.
काळ्या गायीची सेवा करावी
शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे गायीची सेवा करणे. काळ्या गाईची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. गायीच्या शिंगावर कलावा बांधून तिची पूजा करावी. यानंतर गायीभोवती फिरून तिला चार चमचे बुंदी खायला द्यावी.
अन्य उपाय कोणते? Lord Shani
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी हनुमानाची पूजा करा. रोज हनुमान चालिसा पठण केल्याने शनिदेवाच्या कोपापासून तुम्ही वाचू शकता.
तुमच्या कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत करण्यासाठी वृद्ध व्यक्तींचा आदर करा. गरिबांशी चांगलं वागा, त्यांच्याशी गैरवर्तन करू नका आणि कुणाचंही मन दुखवू नका.
भक्तीने शनि मंत्र ‘ॐ शं शनिश्चराय नमः’ चा जप करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





