भारतातील अधिकांश गावं देवी-देवतांना समर्पित असतात. मात्र काही दुर्मीळ गाव अशीही असतात जिथं काहीतरी वेगळाच प्रकार पाहायला मिळतो. उत्तर प्रदेशातील बिसरख गावात स्थानिक लोक रावणाला पूर्वज मानतात आणि पौराणिक राक्षस मानणारे लोक त्याची पूजा करतात. महाराष्ट्रातही असंच एक गाव आहे, जिथं राक्षसांची भक्ती केली जाते. त्यामुळे या गावात तुम्हाला हनुमान मंदिर सापडणार नाही. हनुमान हे पारंपरिकपणे राक्षसांचा वध करणारे मानले जातात. त्यामुळे या गावात हनुमानाचं मंदिर नाही. या गावातील आणखी एक रंजक बाब म्हणजे, या गावात मारुती ब्रँडच्या गाड्याही सापडत नाहीत. संस्कृत शब्द ‘मारुत’ (वारा) पासून घेतलेल्या या गाडीचे नाव ‘वाऱ्याचा पुत्र’ हनुमानाचे आहे.

हनुमान मंदिर नाही l (No Hanuman Temple)

या गावाचं नाव नंदूर निम्बा दैत्य (Nandur Nimba Daitya) आहे. हे गाव अहमदनगर आणि सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. येथील गावकरी हनुमानाची पूजा करीत नाही. त्याच्या गावात हनुमानाचं मंदिर नाही. इतकच नव्हे तर आपल्या मुलांचं नावही हनुमानाच्या नावावरुन ठेवत नाहीत.

याच्या मान्यतेमागील कथा काय आहे?

या प्रथेशी जोडली गेलेली आख्यायिका प्रसिद्ध आहे. ही आख्यायिका निम्ब दैत्य आणि भगवान हनुमान याच्यातील संघर्षाशी जोडली जाते. येथे निम्ब दैत्य राक्षस असला तरी तो भगवान रामाचा भक्त असल्याचं म्हटलं जातं. निम्ब दैत्य याने रामाची प्रार्थना केली. यानंतर रामाने त्याला गावाच्या इष्टदेवाचा दर्जा दिला.

मारूती कार का नको?

द इंडियन एक्सप्रेसनुसार, २००० च्या दशकाच्या सुरुवातील येथे डॉ. सुभाष देशमुख गावकऱ्यांमध्ये प्रसिद्ध चिकित्सक होते. त्याच्याकडे आजूबाजूच्या गावातूनही रुग्ण येत असे, अनेकदा त्यांच्या क्लिनिकबाहेर रांग लागायची. मात्र अचानक त्यांच्या क्लिनिकबाहेरील मोठी रांग गायब झाली. काही काळ डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. खरंतर लोक दूर जाण्याचं कारण त्यांनी नव्याने खरेदी केलेली कार होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मारुती ८०० कार खरेदी केली होती. मारुतीच्या नावाने असलेल्या या कारमुळे गावकरी त्यांच्यापासून दुरावले होते. त्यानंतर त्यांनी मारुती ८०० कार विकली आणि टाटा सुमो खरेदी केली आणि पुन्हा एकदा त्यांच्या क्लिनिकबाहेर रांग लागली.