हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी, विधीनुसार महादेवाची पूजा करण्यासोबतच उपवास देखील केला जातो. धार्मिक ग्रंभामध्ये या व्रताबाबत काही नियम सांगितले आहेत, त्यापैकी एक म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
महाशिवरात्रीच्या दिवशी काय खावे ?
- दूध, दही, लस्सी.
- केळी, सफरचंद, संत्री, इतर हंगामी फळे, यांसारखी ऊर्जा देणारी फळे
- साबुदाणा खिचडी/वडा, मखाना खीर/भाजलेला मखाना, भाजलेले शेंगदाणे.
- राजगिरा, कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ (पुरी, भाकरी).
- सुका मेवा (काजू, बदाम), बटाट्याची भाजी (सैंधव मिठासह).
- केवळ सैंधव मीठ (Rock Salt) वापरावे.
महाशिवरात्रीच्या दिवशी काय खाऊ नये ?
- गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये.
- सामान्य मीठ
- कॅफिनयुक्त चहा, कॉफी (अतिसेवन).
- कांदा, लसूण, मुळा, वांगी, मांस, मासे किंवा तामसिक पदार्थाचे सेवन करू नये.
उपवासाचे महत्त्वाचे नियम,
- सात्विक आहार घ्यावा, कारण हा दिवस संयमाचा आहे.
- दिवसभर उपवास करून रात्री ‘जागरण’ आणि ‘पारण’ करावे.
- शरीराला थकवा येणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुरेसे पाणी आणि फळे घ्यावीत.
- काही जण निर्जला (पाणी न पिता) उपवास करतात, तर काही फळे किंवा एकदा सात्विक भोजन घेऊन उपवास करतात
- शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध, पाणी, बेलाची पाने अर्पण करावीत आणि दिवसभर “ॐ नमः शिवाय” चा जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..