Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या…

Published:
महाशिवरात्रीच्या दिवशी हे नियम पाळल्यास भगवान शिवाचा आशीर्वाद मिळून जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला महादेवाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या…

हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व दिले आहे. या दिवशी उपवास केले जातात आणि विधीनुसार महादेवांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिव विशेष आशीर्वाद देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊयात…

महाशिवरात्रीला काय करावे?

  • सकाळी स्नान करून शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल, दूध, दही, तूप, मध आणि साखरेने (पंचामृत) अभिषेक करा.
  • बेलाची पाने, धोत्रा, भांग, शमीची पाने, पांढरे चंदन आणि रुईची फुले महादेवाला वाहा.
  • दिवसभर उपवास करा आणि रात्री जागरण करून शिवाची पूजा करा.
  •  ‘ॐ नमः शिवाय’ किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
  • शिवलिंगावर ३ पानांचे अखंड बेलपत्र ‘ओम नमः शिवाय’ म्हणत अर्पण करा.
  • घरात पारद शिवलिंग ठेवल्याने वास्तू दोष दूर होतात, मात्र ते अंगठ्यापेक्षा मोठे नसावे.

महाशिवरात्रीला काय करू नये? 

  • शिवलिंगावर तुटलेले तांदूळ (अक्षता), केतकीचे फूल, चंपा, चमेली आणि तुळशीची पाने अर्पण करू नका.
  • तामसिक पदार्थ, कांदा, लसूण आणि मूळा, वांगी खाणे टाळा.
  • दिवसभर झोपू नका आणि कोणाशीही वाद घालू नका.
  • महिलांचा किंवा कोणाचाही अपमान करू नका आणि कठोर शब्द वापरू नका.
  • मांसाहार, मद्यपान, कांदा आणि लसूण खाणे पूर्णपणे टाळावे.
  • पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत.
  • शिवाला केतकीचे फूल, हळद किंवा तुळस वाहू नये.
  • कोणाशीही वाईट बोलू नये, कोणाचा अपमान करू नये आणि रागावू नये.
  • या दिवशी पाणी वाया घालवू नये, याला दोष मानले जाते.
  • घरी शिवलिंग असल्यास ते उत्तरेकडे तोंड करून ठेवू नये.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)