Narali purnima recipes: भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. त्यातीलच एक म्हणजे नारळी पौर्णिमा होय. कोळी बांधवांसाठी हा सण अतिशय खास असतो. यादिवशी लोक गोड पदार्थ बनवतात. तुम्हालाही त्याच-त्याच पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळे बनवायचे असेल तर तुम्ही नारळाचे पेढे बनवू शकता. पाहूया रेसिपी…
नारळाचे पेढे बनवण्यासाठी साहित्य-
१ वाटी दूध
१ वाटी मिल्क पावडर
चवीनुसार साखर
१ वाटी नारळ पावडर
१ चमचा वेलची पावडर
नारळाचे पेढे बनवण्याची रेसिपी-
एक वाटी दूध, एक वाटी नारळ पावडर, चवीनुसार पिठीसाखर घालून गॅस चालू करा आणि मध्यम आचेवर नारळाचे दूध सुकेपर्यंत शिजवा
दूध सुकले की, एक वाटी दूध पावडर घाला आणि चांगले मिसळा.
गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर चवीनुसार साखर, एक चमचा वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा.
हाताच्या मदतीने छोटे गोळे बनवा आणि मध्यभागी दाबा.
सर्व पेढे त्याच प्रकारे तयार करा.
अशाप्रकारे नारळाचे पेढे तयार आहेत.





