श्रावण सोमवारच्या उपवासाला बनवा कच्च्या केळीचा शिरा, ट्राय करा हटके रेसिपी

Published:
आपण उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या कच्च्या केळीपासून बनवला जाणारा शिरा ट्राय करणारा आहोत.
श्रावण सोमवारच्या उपवासाला बनवा कच्च्या केळीचा शिरा, ट्राय करा हटके रेसिपी

Shravan Somwar Special Recipes:   हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्वाचा असतो. या महिन्यात सोमवारला विशेष महत्व असते. श्रावण सोमवाराला उपवास केला जातो. या उपवासाला काही विशिष्ट पदार्थच खाल्ले जातात. त्यामुळेच आज आपण उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या कच्च्या केळीपासून बनवला जाणारा शिरा ट्राय करणारा आहोत. याची रेसिपी अत्यंत सोपी आहे…

 

कच्च्या केळीचा शिरा बनवण्यासाठी साहित्य-

 

कच्ची केळी -४ ते ५

गूळ २ कप

तूप- ४ चमचे

दूध- २ कप

ड्रायफ्रूट्स १ कप

वेलचीपूड- २ चमचे

 

कच्च्या केळीचा शिरा बनवण्याची रेसिपी-

 

कच्च्या केळीचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही, केळी स्वच्छ धुवून कुकर मध्ये लावा.

कुकरमध्ये केळी चांगली शिजवून घ्या.

केळी शिजल्यास त्यांना चांगले मॅश करून घ्या.

आता एका पॅनमध्ये तूप घाला आणि त्यात साखर घालून चांगले मिश्रण बनवा.

नंतर त्यात दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवा.

आता यामध्ये इलायची पावडर घाला.

सर्व मिश्रण एकत्र करून चांगले ढवळून घ्या.

अशाप्रकारे तुमचा कच्च्या केळीचा शिरा तयार आहे.

 

कच्च्या केळीचे आरोग्य फायदे-

वजन कमी करण्यास मदत करते-
कच्च्या केळ्यांमध्ये मोठा प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ते खाल्ल्यास पोट बराच काळ भरलेले वाटते. त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. म्हणून वजन कमी करण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते-
कच्च्या केळीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. खासकरून उपवासाला. कच्च्या केळीच्या सेवनाने पोटाच्या अनेक तक्रारी जसे कि, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. म्हणून आहारात कच्ची केळी खाणे फायदेशीर असते.

अतिसारात फायदेशीर-
पावसाळ्यात अतिसाराची समस्या अधिक असते. अशा परिस्थितीत कच्च्या केळीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.कच्च्या केळीमध्ये असलेले पोषक घटक तुम्हाला त्यातून आराम देऊ शकतात. तसेच, उलट्या, थकवा, मळमळ आणि डोकेदुखी कमी करण्यासाठीदेखील ते खूप प्रभावी मानले जाते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews