Shravan Special Recipes: श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. उपवासाला काही विशिष्ट पदार्थच खाल्ले जातात. त्यामुळे त्या पदार्थांपासून नवनवीन रेसिपीज बनवल्या जातात. तुम्हालाही फक्त बटाटा खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही बटाट्यापासून काही टेस्टी स्नॅक्स बनवू शकता. विशेष म्हणजे हे स्नॅक्स उपवासाला खायला एकदमी परफेक्ट आहेत. चला पाहूया रेसिपी….
बटाट्याचे स्नॅक्स बनवण्यासाठी साहित्य-
बटाटे- ३-४
तूप- २ चमचे
काळी मिरीपूड- १ चमचा
हिरवी मिरची- बारीक चिरून
कोथिंबीर- १ टीस्पून
जिरे- २ चमचे
बटाट्याचे स्नॅक्स बनवण्याची रेसिपी-
उपवासासाठी बटाट्याचे स्नॅक्स बनवनासाठी सर्वप्रथम बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून उकडून घ्यावे.
बटाटे उकडल्यानंतर त्याच्या साली काढून एका आकारात काप करून घ्यावे.
आता एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घालावे.
नंतर त्यामध्ये कापलेले बटाटे घालून चांगले भाजून घ्यावे.
आता बटाटे सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यामध्ये मीठ, काळी मिरेपूड, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून पुन्हा भाजून घ्यावे.
अशाप्रकारे तुमचे उपवासाचे बटाट्याचे स्नॅक्स तयार आहेत.
बटाट्याचे फायदे-
व्हिटॅमिन्स सी भरपूर प्रमाणात असते-
बटाटा हा खायला जितका चविष्ट असतो, तितकेच त्याचे फायदेसुद्धा आहेत. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन्स सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे बटाटा खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन्स सी ची कमतरता पूर्ण होते. शिवाय चेहरासुद्धा चांगला होतो.
पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत्र-
बटाट्यामध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बटाट्याच्या सेवनाने शरीरात पोटॅशिअमची कमतरता निर्माण होत नाही. पोटॅशिअम युक्त बटाट्याच्या सेवनाने मसल्स चांगले राहतात. शिवाय अनेक आजार दूर होतात.
फायबर मोठ्या प्रमाणात असते-
बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे तुमची अनावश्यक खाण्याची लालसा दूर होते. तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तसेच बटाटा आतड्यांचा हालचालीत मदत करते. त्यामुळे पोटाचे अनेक आजार दूर होतात.
वजन कमी करण्यास मदत करते-
बहुतेकवेळा आपण वाचलं आहे कि बटाट्याच्या सेवनाने वजन वाढते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल कि, उकडलेले बटाटे योग्य प्रमाणत खाल्यास वजन कमी करण्यास मदत होते. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोट बराचकाळ भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यास फायदा होतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





