Marathi News

Mandir Tips : मंदिरातून घरी येताना कधीही करू नका या चुका; अन्यथा सगळी भक्ती वाया जाईल

Published:
मंदिरात गेल्याने सुख शांती लाभते आणि मनाचे मानसिक समाधानी होते असं म्हटलं जातं. देवाचा आशीर्वाद लागतो तो वेगळाच
Mandir Tips : मंदिरातून घरी येताना कधीही करू नका या चुका; अन्यथा सगळी भक्ती वाया जाईल

प्रत्येक धर्मातील लोकांची श्रद्धास्थाने ही वेगवेगळे असतात कोणी मंदिरात जातो ,कोणी मशिदीत जातो, तर कोणी चर्चमध्ये जातो…. हिंदू धर्मातील लोक ही मंदिरात जात असतात…(Mandir Tips) वेगवेगळ्या देवांच्या दररोज मंदिरात जाणे, त्या ठिकाणी देवाला नमस्कार करणे, प्रार्थना करणे आणि आशीर्वाद मागणे हा हिंदू धर्मीयांचा नित्याचाच दिवस…. मंदिरात गेल्याने सुख शांती लाभते आणि मनाचे मानसिक समाधानी होते असं म्हटलं जातं. देवाचा आशीर्वाद लागतो तो वेगळाच…. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही टाळल्या पाहिजेत. अन्यथा देव तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते.

कोणत्या चुका करू नका? Mandir Tips

जर तुम्ही कोणत्या मंदिरात गेला असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रसाद दिला असेल तर तो प्रसाद वाटेतच मध्ये कुठे खात बसू नका.  तो प्रसाद घरी आणा. संपूर्ण कुटुंबात वाटा आणि नंतरच त्याचे सेवन करा. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात. बरेच लोक प्रसाद अर्पण करतात आणि मंदिरातून रिकाम्या हाताने परततात, परंतु हे देखील अशुभ मानले जाते.

लगेच हातपाय धुऊ नका

मंदिरातून घरी आल्यानंतर लगेचच हातपाय तोंड धुऊ नका. याचे कारण म्हणजे वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही मंदिरातून सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जाता. हातपाय धुण्याने मंदिरातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा लगेच नष्ट होते. शिवाय, तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहण्यासाठी तुम्ही मंदिरातून थेट घरी परतले पाहिजे. रस्त्यातच कुठे थांबू नये. Mandir Tips

चुकीचे विचार मनात आणू नका

मंदिरातून घरी परतत असताना तुमच्या मनात कधीही चुकीचे,  वाईट आणि द्वेष भावनेचे विचार आणू नका… मंदिरातून घरी परतत असताना कोणाबद्दल वाईट बोलू नका… कोणाला शिव्या शाप देऊ नका…. एखाद्याची थट्टा करू नका… मंदिरात गेलाय, देवाला प्रार्थना केली आणि बाहेर आल्यानंतर कोणाविषयी कपटकारस्थान करतोय असं कधीही वागू नये… अन्यथा तुम्ही केलेली प्रार्थना, देवाची भक्ती हे सगळं काही पाण्यात वाया गेल्यासारखं होईल…

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews