Moles Astrology : माणसाच्या शरीरावर तीळ हे असतेच, त्याशिवाय माणसाचं अंगच भरत नाही असं म्हटलं जातं. काहीजणांच्या नाकावरती असतं, काहींच्या पोटावर तीळ असते, काहींच्या ओठावरती असतं, तर काहींच्या पायावरती तीळ असतं. अंगावर तीळ असणे ही तशी म्हणली तर सामान्य गोष्ट आहे. परंतु समुद्र शास्त्रानुसार शरीराच्या काही विशिष्ट भागांवरील तीळांबद्दल सांगू जे राजयोगाचे किंवा शुभ योगाचे प्रतीक मानले जातात. शास्त्रांनुसार, या विशिष्ट भागांवरील तीळ सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक यश आणि आदर आणू शकतात. चला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया…
कपाळावरील तीळ (Moles Astrology)
कपाळावरील तीळ अत्यंत शुभ मानला जातो. जेव्हा तीळ कपाळाच्या मध्यभागी किंवा वरच्या भागात असतो तेव्हा तो आयुष्यभराच्या यशाचे, स्पष्ट विचारसरणीचे आणि नेतृत्व क्षमतेचे लक्षण मानले जाते. कपाळावर तीळ असलेले लोक बहुतेकदा नेतृत्वाच्या भूमिकेत आढळतात आणि आयुष्यात पुढे जाण्याची नैसर्गिक प्रेरणा त्यांच्यात असते. ते आयुष्यात १०० टक्के यशस्वी होतात. Moles Astrology
माने आणि पायांजवळ तीळ
शरीराच्या खालच्या भागांवर, जसे की मानेच्या खालच्या भागात किंवा पायांवर तीळ देखील शुभ मानले जातात. पायांवर तीळ असणे हे अशा व्यक्तीचे लक्षण आहे ज्याला प्रवास करण्याची, अनुभव घेण्याची आणि जीवनात नवीन दिशा शोधण्याची आवड आहे. ते सतत फिरत असतात आणि नव्या जगाचा शोध घेत असतात.
नाभीजवळ तीळ
काही ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, नाभीभोवती तीळ हा आनंद आणि समृद्धीचे एक मजबूत लक्षण आहे. असे मानले जाते की त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तो आयुष्यात आर्थिक स्थिरता राखेल. त्यांच्या हातात पैसा नेहमी खेळत असतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





