घरात पैसाच टिकत नाही? आर्थिक अडचण दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ रत्ने

Published:
रत्न शास्त्रानुसार प्रत्येक कार्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
घरात पैसाच टिकत नाही? आर्थिक अडचण दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ रत्ने
Which gemstone to wear to solve financial problems:   रत्नशास्त्रानुसार, मनुष्याला ग्रह दोष दूर करण्यासाठी आणि प्रत्येक कार्यात चांगले परिणाम मिळवण्यासाठी रत्न धारण करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार, रत्न धारण केल्याने मनुष्याचे ग्रह दोष दूर होतात. तसेच विविध कार्यांमध्ये येणाऱ्या अडचणीही दूर होतात. आणि प्रत्येक कार्यात यश मिळण्यास मदत होते.

परंतु रत्न शास्त्रानुसार प्रत्येक कार्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळेच ज्योतिषांच्या सल्ल्याने किंवा जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने योग्य समस्येसाठी योग्य रत्न धारण करणे गरजेचे आहे.

अनेक लोकांना कष्ट करूनही आर्थिक समस्या असते. अशा लोकांकडे पैसा टिकत नाही. किंवा पैसे मिळण्यास अडचण येते. त्यामुळे अशा व्यक्तींना रत्न धारण करणे फायदेशीर ठरते. त्यामुळेच आज आपण घरात पैसे टिकवण्यासाठी आणि आर्थिक चणचण दूर करण्यासाठी कोणते रत्न धारण करता येईल याबाबत जाणून घेणार आहोत…

 

सोनेरी पुखराज-

रत्न शास्त्रानुसार, सोनेरी पुखराज रत्न धारण केल्याने आर्थिक चणचण दूर होते. या शास्त्रानुसार, जर तुम्हालाही सतत आर्थिक नुकसान होत असेल किंवा घरात पैसा राहत नसेल तर सोनेरी पुखराज धारण करावे. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील.

 

ग्रीन जेड स्टोन-

धन आणि संपत्तीसाठी जेड स्टोन अत्यंत फायदेशीर समजले जाते. रत्न शास्त्रानुसार, हे रत्न परिधान केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात. आणि तुमच्या आर्थिक बाबींमध्ये प्रगती होते. खाकरून नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यक्तीने हे रत्न धारण करणे अत्यंत फायदेशीर असते.

 

टायगर स्टोन-

टायगर स्टोन धारण केल्याने बॅडलक दूर होऊन नशीब फळफळते. या रत्नाच्या मदतीने तुमच्या आर्थिक अडचणी दु होतात. शिवाय तुम्हाला आर्थिक धनलाभ होतो.

 

माणिक-

रत्न शास्त्रानुसार, घरामध्ये धन संपत्ती येण्यासाठी माणिक धारण करता येते. यामुळे आर्थिक चणचण दूर होईल. आणि तुमच्या घरात पैसा टिकून राहील.

 

ग्रीन ऍव्हेंच्युरीन-

रत्न शास्त्रानुसार हे रत्न धन आकर्षित करते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर हे रत्न धारण करणे फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला पैशांची प्राप्ती होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)