येत्या सोमवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबर पासून नवरात्री उत्सवाला (Navratri 2025) सुरुवात होत आहे. संपूर्ण देशात नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते. दुर्गा पूजा, गरबा, दांडिया आणि इतर लोकनृत्यांसह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्रीचे नऊ दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती करणारे मानले जातात. या काळात काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे नाहीतर देवी दुर्गामाता तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते. नवरात्रीत नेमकं काय करू नये?? हेच आज आम्ही तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहोत.
नवरात्रीत काय करू नये?? Navratri 2025
1) मसालेदार पदार्थ टाळा. हे शक्य नसल्यास लसूण आणि कांदा टाळा.
हे ही वाचा
2) घरात कात्रीचा वापर जास्त करू नका.
3) नऊ दिवस दाढी, नखे आणि केस कापणे टाळा. हे पारंपारिकपणे उपवासाच्या नियमांविरुद्ध आहे.
4) मांस, मद्य आणि तामसिक अन्न खाऊ नका. यामुळे उपवास आणि पूजेचे पावित्र्य भंग होते.
5) भांडणे, राग आणि शिवीगाळ करू नका, यामुळे देवी नाराज होण्याची शक्यता असते.
6) कोणत्याही स्त्री विरुद्ध अपशब्द वापरू नये.
7) उपवासाच्या वेळी बेल्ट, पर्स, बूट, चप्पल इत्यादी चामड्याच्या वस्तू वापरू नका.
8) नवरात्रीच्या काळात दारू आणि तंबाखूचे सेवन करू नका.
नवरात्रीचे महत्व
शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्यापासून शरद ऋतूची सुरुवात होते, म्हणूनच याला शारदीय नवरात्री म्हणतात. हा उत्सव देवी दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित आहे. या काळात देवी दुर्गेची उपासना आणि उपवास केल्याने साधकाच्या सर्व चिंता आणि समस्या दूर होतात.
शारदीय नवरात्री 2025 तारीख –
प्रतिपदा – २२ सप्टेंबर २०२५ – पांढरा रंग (सोमवार )
द्वितीया – २३ सप्टेंबर २०२५ – लाल रंग (मंगळवार)
तृतीया – २४ सप्टेंबर २०२५ – निळा रंग (बुधवार)
चतुर्थी – २५ सप्टेंबर २०२५ – पिवळा रंग (गुरुवार)
पंचमी – २६ सप्टेंबर २०२५ – हिरवा रंग (शुक्रवार)
षष्टी – २७ सप्टेंबर २०२५ – राखाडी रंग (शनिवार )
सप्तमी – २८ सप्टेंबर २०२५ – केशरी रंग (रविवार)
अष्टमी – २९ सप्टेंबर २०२५ – मोरपंखी रंग (सोमवार)
नवमी – ३० सप्टेंबर २०२५ – गुलाबी रंग (मंगळवार)
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)