Navratri Vastu Tips: नवरात्रीमध्ये घरात कोणत्या दिशेला करावी घटस्थापना? जाणून घ्या वास्तु नियम

Published:
हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. नवरात्री दरम्यान घरात काही वास्तु नियम पाळल्यास पूजेचे महत्व आणखी वाढते.
Navratri Vastu Tips: नवरात्रीमध्ये घरात कोणत्या दिशेला करावी घटस्थापना? जाणून घ्या वास्तु नियम

Navratri Special:   देशभरात येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. भक्तांना नवरात्रोत्सवाची मोठी उत्सुकता लागून आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी दुर्गामातेची पूजा केली जाते. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. या नऊ दिवसांत घरातील वातावरण एकदम प्रसन्न असते.

नवरात्री दरम्यान घरात काही वास्तु नियम पाळल्यास पूजेचे महत्व आणखी वाढते. हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. घरात वास्तु शास्त्राचे नियम पाळल्यास सकारात्मक ऊर्जा येते आणि त्याचा चांगला प्रभाव दिसून येतो. वास्तु शास्त्रानुसार, नवरात्रीदरम्यान घरात काही वास्तू नियम पाळल्यास देवीची कृपादृष्टी लाभते. चला पाहूया हे वास्तु नियम काय आहेत….

 

घरात स्वच्छता ठेवा-

वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये घराची चांगली स्वच्छता करून घ्यावी. स्वच्छता आणि नीटनेटक्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि देवी दुर्गा माता प्रसन्न होते. नवरात्रीपूर्वी घरातील तोडक्या-मोडक्या वस्तू बाहेर काढाव्यात. घरातील फरशी कोपरे गंगाजल शिंपडून पवित्र करून घ्यावेत. असे केल्याने सकारात्मकता आणि सुखसमृद्धी आकर्षित होते.

 

योग्य दिशेत करा घटस्थापना-

वास्तु शास्त्रानुसार घरातील उत्तर-पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे. त्यामुळे घट स्थापना किंवा कळसस्थापना याच उत्तर-पूर्व दिशेत करणे योग्य असते. घट किंवा कळस तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवा त्यामध्ये गंगाजल, सुपारी आणि आंब्याची पाने घाला आणि हे कळस माताराणीच्या समोर ठेवा. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते.

 

पूजेचे योग्य स्थान-

नवरात्रीमध्ये घरातील उत्तर-पूर्व दिशेत पूजा मांडावी. ही दिशा अध्यात्मिक ऊर्जेची दिशा समजली होते. याठिकाणी देवीची मूर्ती उत्तर-पूर्व दिशेला तोंड करून ठेवावे. पूजेच्या ठिकाणी कोणताही गोंधळ करू नये. देवी मातेच्या समोर नियमित धूपबत्ती, दिवा लावून ठेवावा. असे केल्याने देवी प्रसन्न होते.

 

दिवा लावण्याची योग्य दिशा-

वास्तु शास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये दक्षिण-पूर्व दिशेला दिवा लावून ठेवावा. असे केल्याने अग्नी तत्व संतुलित होतात. आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दिवा नियमित स्वच्छ करा आणि रात्रभरसुद्धा दिवा लावून ठेवा. असे केल्याने देवी मातेचा आशीर्वाद लाभतो.

 

मुख्य प्रवेशद्वाराची सजावट-

वास्तु शास्त्रानुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार सकारात्मकतेचे ऊर्जा केंद्र असते. त्यामुळेच नवरात्रीमध्ये घराचे मुख्य प्रवेशद्वार आंब्याच्या पानांच्या तोरणाने आणि स्वस्तिक चिन्हे काढून सजवा.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)