Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ‘या’ वस्तू करा दान, आर्थिक अडचणी होतील दूर

Published:
हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, कोजागिरी पौर्णिमेला काही वस्तूंचे दान केल्याने आर्थिक संकट पैशाची तंगी या त्रासांपासून मुक्ती मिळते.
Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ‘या’ वस्तू करा दान, आर्थिक अडचणी होतील दूर

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेचा सण खूप महत्वाचा आहे. हा सण आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, ज्याला काही ठिकाणी शरद पौर्णिमा आणि रास पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही काही वस्तू व गोष्टी दान केल्याने सुख आणि समृद्धी मिळते आणि दारिद्र्य दूर होते..

तांदूळ

कोजागिरी पौर्णिमेला तांदूळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशांची भरभराट होते. तांदूळ हे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे तांदूळ दान केल्याने आर्थिक समृद्धी येते.

पांढरे कपडे

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना पांढरे कपडे दान करावे. हे शक्य नसल्यास इतर कोणत्याही रंगांचे कपडे दान करावे. या दिवशी कपडे दान करणे हे सर्वात मोठे दान मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होतात आणि घरात धन-संपत्तीची वाढ होते. गरजूंना पांढरे किंवा इतर कापड दान केल्याने जीवनातील कष्ट कमी होतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

चांदी

चांदीचे दान केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, असे मानले जाते. चांदीचा संबंध चंद्राशी सांगितलेला आहे. त्यामुळे शक्य असल्यास कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणाला चांदी दान करावी. चांदी व्यतिरिक्त चंद्र देवाशी संबंधित इतर कोणताही पांढरा धातू दान करू शकता. यामुळे कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होते. मन शांत होते आणि संपत्तीत वाढ होते.

दूध, दही आणि खीर

कोजागिरी पौर्णिमेला खीर बनवून गरीब आणि गरजूंना दान केल्यास घरात समृद्धी येते. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवून पितात. या दिवशी दूध, दही आणि खीरसारखे पांढरे पदार्थ दान करावे. यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.

गूळ

धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेला गूळ दान करणे शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews