Kojagiri Purnima Wishes in Marathi : कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा

Published:
कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात अत्यंत महत्व आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना खास शुभेच्छा द्या.
Kojagiri Purnima Wishes in Marathi : कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा

कोजागिरी पौर्णिमेला खास महत्त्व आहे. दरवर्षी अश्विन पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी दूध, साखर आणि मसाल्यांनी बनवलेले थंड गोड दूध चांदण्यात ठेवून नंतर कुटुंबीय आणि मित्रांसोबत पिण्याची प्रथा आहे. या खास प्रसंगी तुम्ही येथे दिलेले शुभेच्छा संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता…

यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी?

तिथी प्रारंभ : ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी सुरु होईल.
तिथी समाप्ती : ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी संपेल.

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

कोजागिरीचा चंद्र तेजस्वी
आकाशी पडले चांदणे टिपोरे
चंद्रासारख्या गोड माझ्या प्रियजनांना
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

दूध केशरी,
चंद्रांचे चांदणं,
कोजागिरीचे रूप आगळे…
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

चांदण्यांत न्हालेले आकाश,
दुधाच्या गोडीत वाढला नात्यांचा विश्वास,
लक्ष्मीमातेची मिळो कृपा खास,
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा अनंतास!

केशर दुधाची गोड चव,
चंद्रप्रकाशाची रूपेरी लव,
मना-मनात नांदो आनंद भरपूर,
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

रुपेरी चांदण्यांनी तुमचं आयुष्य उजळून निघो
कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू या सण कोजागिरीचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात,
दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा…
आजचा दिवस तुमच्यासाठी
सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीचे दूध,चंद्राचा प्रकाश
दिवस आजचा आहे खास
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

कोजागिरीच्या दिनी
चंद्राचे आकाशी
रुप बहरले,तेजाने त्याच्या
सर्वांना मोहून टाकले
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

कोजागिरी पौर्णिमा
तुमच्या आयुष्यात
सुख समृद्धी,सौभाग्य
भरभराट घेऊया येवो
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)