Kojagiri Masala Doodh Recipe : कोजागिरी पौर्णिमेला बनेल परफेक्ट ‘मसाला दूध’! ‘जाणून घ्या सोपी रेसिपी…

Published:
यंदा कोजागिरी पौर्णिमेला घरच्या घरीच बनवा सोप्या पद्धतीने चविष्ट मसाला दूध, जाणून घ्या रेसिपी!
Kojagiri Masala Doodh Recipe : कोजागिरी पौर्णिमेला बनेल परफेक्ट ‘मसाला दूध’! ‘जाणून घ्या सोपी रेसिपी…

आज कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते आणि चंद्रप्रकाशात मसाला दूध पिण्याची परंपरा आहे, कारण असे मानले जाते की चंद्रप्रकाशात अमृत असते. मसाला दूध पौष्टिक असते आणि ते केशर, वेलची, बदाम व पिस्त्यांसारख्या घटकांमुळे चविष्ट लागते. कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक घरात मसाला दूध बनवले जाते. चला तर मग जाणून घेऊया मसाला दूध बनवण्याची सोपी रेसिपी…

मसाला दूध बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

  • १ लिटर फुल फॅट दूध
  • १/४ कप बदाम
  • १/४ कप काजू
  • १/४ कप पिस्ता
  • २ हिरवी वेलची
  • चिमूटभर जायफळ पूड
  • चिमूटभर केशराच्या काड्या
  • चवीनुसार साखर

कृती

  • एका मिक्सरच्या भांड्यात बदाम, काजू, पिस्ता, वेलची आणि जायफळ पूड एकत्र घ्या.
  • सर्व जिन्नस एकत्र वाटून जाडसर मिश्रण तयार करा. 
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घ्या. 
  • गॅसवर दूध गरम करायला ठेवा.
  • दूध थोडे घट्ट होईपर्यंत उकळवा. मग त्यात तयार केलेला मसाला आणि केशरच्या काड्या घाला.
  • नंतर चवीनुसार साखर घालून सर्व साहित्य दुधात चांगले मिसळा. 
  • दूध ५ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या, जेणेकरून दुधाची चव वाढेल. 
  • गरमागरम मसाला दूध तयार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात याचा आस्वाद घ्या. 

टीप : तुम्ही चवीनुसार चारोळी देखील घालू शकता.