Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्या घरी बनवा तांदळाची स्वादिष्ट खीर

Published:
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी खीर आणि मसाला दूध केले जाते तुम्ही सुद्धा घरच्याघरी बनवा स्वादिष्ट खीर.
Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्या घरी बनवा तांदळाची स्वादिष्ट खीर

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण होऊन पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. या दिवशी चांदण्या रात्री चांदीच्या भांड्यात खीर ठेवण्याची प्रथा आहे. खीरमध्ये दूध, साखर, ड्रायफ्रुट्स असतात. यासारख्या घटकांचा कारक देखील चंद्र आहे. म्हणून त्यामध्ये चंद्राचा प्रभाव पडतो सर्वात महत्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्राचा प्रकाश खीरीवर पडतो. तेव्हा या खीरीत अमृत उतरते. आज कोजागिरी पौर्णिमेला घरीच तयार करा सोपी आणि स्वादिष्ट तांदळाची खीर  चला तर मग जाणून घेऊया मसाला तांदळाची खीर  बनवण्याची सोपी रेसिपी…

साहित्य

  • १/४ कप तांदूळ (बासमती किंवा कोणताही प्रकार)
  • ५ कप दूध
  • साखर, चवीनुसार
  • वेलची पूड
  • केशर, मनुके, आणि सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते)

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुवा आणि किमान ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करा. दूध उकळल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घाला.
  • मंद आचेवर तांदूळ दुधात शिजवा. तांदूळ पूर्णपणे शिजून दुधाला घट्टपणा येईपर्यंत शिजवत रहा.
  • तांदूळ मऊ झाल्यावर त्यात साखर, वेलची पूड, केशर आणि सुका मेव्याचे तुकडे घाला.
  • खीर आणखी थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • खीर तयार झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या.
  • कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ही खीर चंद्रप्रकाशात उघड्यावर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला नैवेद्य म्हणून दाखवून ग्रहण करा. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews