देशात नवरात्रीचा उत्सव (Navratri 2025 )मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून (Navratri Special) सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीला नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हे करत असताना नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास करतात. परंतु नवरात्रीचे उपवास करताना तुम्हाला तुमच्या शरीराची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उपवास करताना तुम्ही जर तुमच्या शरीराची व तुमच्या आहाराची काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते .
1) जास्त वेळ अधिक उन्हात फिरू नका :
उपवासाच्या वेळी जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे आणि उपवासा दरम्यान जास्त वेळ उन्हात जाणे टाळावे. यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होऊन शरीरांतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तब्येतीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो कामाव्यतिरिक्त उन्हात फिरणे टाळावे
2) योग्य प्रमाणात पाणी प्या : Navratri 2025
पाणी म्हणजे जीवन आहे. उपवास करताना योग्य प्रमाणात पाणी प्यावे. उपवासा दरम्यान तुम्हाला बद्धकोष्टता, आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो . त्यामुळे उपवासात योग्य प्रमाणात पाणी प्यावे. तसेच पाण्याचे प्रमाण असलेले उपवासाचे पदार्थ आहारात ठेवावेत .
3) साखरेचे प्रमाण अधिक असलेले फळ खाणे टाळावेत:
उपवास करताना अधिक साखरेचे प्रमाणअसलेले फळ खाणे टाळले पाहिजेत. कारण या फळामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढते . यामुळे तुम्ही डायबेटीजचे रुग्ण असाल तर तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो .(Navratri 2025)
शारदीय नवरात्री 2025 तारीख –
प्रतिपदा – २२ सप्टेंबर २०२५ – पांढरा रंग (सोमवार )
द्वितीया – २३ सप्टेंबर २०२५ – लाल रंग (मंगळवार)
तृतीया – २४ सप्टेंबर २०२५ – निळा रंग (बुधवार)
चतुर्थी – २५ सप्टेंबर २०२५ – पिवळा रंग (गुरुवार)
पंचमी – २६ सप्टेंबर २०२५ – हिरवा रंग (शुक्रवार)
षष्टी – २७ सप्टेंबर २०२५ – राखाडी रंग (शनिवार )
सप्तमी – २८ सप्टेंबर २०२५ – केशरी रंग (रविवार)
अष्टमी – २९ सप्टेंबर २०२५ – मोरपंखी रंग (सोमवार)
नवमी – ३० सप्टेंबर २०२५ – गुलाबी रंग (मंगळवार)
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





