Navratri Durga Puja sahitya: गणेशोत्सवानंतर आता घराघरात नवरात्रीची जोरदार तयारी सुरु आहे. नवरात्रीसाठी जवळपास घराची संपूर्ण स्वच्छता करून झाली आहे. आता सर्वांनाच दुर्गा मातेच्या आगमनाची आतुरता लागून आहे. नवरात्रीमध्ये देवीची भक्तिभावाने पूजा केली जाते. देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वजण भक्तिभावाने उपवासदेखील करतात.
येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा पर्व सुरु होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार नवरात्री हा सण आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथपर्यंत साजरा केला जातो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ शक्तिशाली रूपांची पूजा केली जाते. घरोघरी घटसुद्धा बसवले जातात. आपण नवरात्री सुरु होण्यापूर्वी नवरात्रीच्या पूजेमध्ये कोणकोणते साहित्य आवश्यक असते. याबाबत आपण जाणून घेऊया….
दुर्गा मातेच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य-
नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या पूजेसाठी साहित्यात अष्टगंध, कुमकुम, हळदी, धूप-दीपचे साहित्य, नैवेद्य, फुले, अक्षता, पान-सुपारी, नारळ, अगरबत्ती, चंदन, लाल वस्त्र, लाल ओढणी, फळे, मिठाई, आंब्याची पाने, श्रीगणेशाची मूर्ती, वेलची, लवंग, कापूर, सुंगंधीत तेल,तोरण, हिरव्या बांगड्या या साहित्याची आवश्यकता असते.
घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य-
नवरात्रीमध्ये घट स्थापन करण्यासाठी कळस, मातीचे कळस, सात प्रकारची धान्ये, गंगाजल, नाणी, आंब्याची पाने, तांदूळ, असे साहित्य आवश्यक असते.
दीपला विशेष महत्व-
हिंदू धर्मानुसार नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या पूजेसोबत आणि उपवासासोबतच अखंड दीप प्रज्वलित करण्यालाही विशेष महत्व आहे. यामध्ये घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केल्यास तो नवरात्रीची सांगता होईपर्यंत अखंड प्रज्वलित ठेवणे आवश्यक असते. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते. तसेच वास्तु शास्त्रानुसार घरातील आग्नेय दिशा हे अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे अखंड दीप प्रज्वलित करून आग्नेय दिशेला ठेवणे चांगले असते.
तोरण-
सणासुदीला नेहमीच घराला तोरण बांधले जाते. नवरात्रीमध्येसुद्धा घराच्या मुख्य दरवाजाला तोरणे लावणे चांगले असते. नवरात्रीमध्ये झेंडूची फुले, आंब्याची किंवा अशोकाची पाने यांच्यापासून तयार केलेले तोरण लावावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता येते. तसेच घरात सुखसमृद्धी येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






