What to do and what not to do in Navratri: येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सव हा सण देवी दुर्गा मातेला समर्पित आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच नऊ दिवस उपवास केले जातात. नवरात्रीमध्ये सर्वजण देवी दुर्गा मातेच्या भक्तीत मग्न असतात. तसेच शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळेच आज आपण नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत जाणून घेऊया…..
नवरात्रीमध्ये काय करावे?
– नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट स्थापन करा. आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करा.
– नवरात्रीदरम्यान घर आणि पूजेचे स्थान साफसफाई करून अगदी स्वच्छ ठेवा. असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि सकारात्मकता येते.
-नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित करा असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते.
-नवरात्रीमध्ये उपवसादरम्यान फक्त सात्विक आहार घेणेच आवश्यक असते. यामध्ये फळे, दूध, कुट्टू आणि शिंगाड्याचे पदार्थ खाणे योग्य असते.
-नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करा. असे केल्याने तुम्हाला मनासारखे फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल.
-नवरात्रीमध्ये दानधर्म करणे फारच चांगले असते. नवरात्रीमध्ये अन्न, वस्त्र किंवा धनधान्य यांचे दान करावे.
नवरात्रीमध्ये काय करू नये?
-नवरात्रीदरम्यान नऊ दिवस तामसिक आहाराचे सेवन करणे टाळावे. अर्थातच कांदा, लसूण आहारात समाविष्ट करू नये.
-नवरात्रीमध्ये केस आणि नखे कापणे टाळावे.
-नवरात्रीमध्ये चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे कि पर्स, चप्पल, बेल्ट इत्यादींचा वापर करणे टाळावे.
-नवरात्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे टाळावे. अशा गोष्टीं केल्याने देवी नाराज होते.
-नवरात्रीमध्ये उपवास असल्यास दिवसा झोपणे टाळावे असे केल्यास उपवास खंडित होऊ शकतो.
-नवरात्रीदरम्यान कोणाचाही अपमान करणे टाळावे. खासकरून महिला आणि वृद्धांचा कारण या दिवसांत दुर्गा मातेच्या सर्व शक्ती रूपांची पूजा केली जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






