Marathi News

Navratri Wishes: शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, इथे आहेत एकापेक्षा एक संदेश

Published:
नवरात्रीच्या नऊ दिवस देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
Navratri Wishes: शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, इथे आहेत एकापेक्षा एक संदेश

Navratri Marathi Wishes:   गणेशोत्सवानंतर आता देशभरात नवरात्रीची उत्सुकता लागून आहे. यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान घरोघरी घटस्थापना होणार आहे. भक्त देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नऊ दिवस अगदी भक्तिभावाने पूजा करतात. तसेच अगदी आनंदाने हा पर्व साजरा करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. आज आपण नवरात्रीच्या अशाच काही सुंदर शुभेच्छा पाहूया…..

नवरात्रीच्या मराठीत शुभेच्छा-

१) सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते

शारदीय नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !!

 

२) दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुम्हाला आणि तुमच्या

सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो,

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

३) दुर्गा माता आली तुमच्या दारी करुनी सोळा श्रृंगार

तुमची जीवनात कधीही न होवो हार

सदैव सुखात राहो तुमचा परिवार

शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

४) आपली सर्व कार्य पूर्ण होवोत

कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो

धन धान्य व प्रेमाने भरलेले असो जीवन

ह्या नवरात्रीला घरात होवो देवीचे आगमन

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा

 

५) “नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर

देवी दुर्गा तुम्हाला शक्ती, बुद्धी आणि अनंत आनंद देवो.

शुभ नवरात्र!”

 

शारदीय नवरात्रोत्सव शुभेच्छा

६) “नवरात्रीच्या नऊ रात्री

तुमचे जीवन नवगुणी आशीर्वाद,

आनंद आणि समृद्धीने भरून जावोत.

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

७) या नवरात्रीनिमित्त देवी दुर्गा

तुम्हाला जीवनातील आव्हानांमधून मार्गदर्शन करो

आणि तुम्हाला यश आणि आनंद देवो.

शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

८) शरद ऋतूची पाने पडताच आणि नवरात्रसुरू होताच

देवी दुर्गा मातेच्या आशीर्वादाने

तुमचे जीवन सुखसमृद्धी आणि आनंदाने भरून जावो.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

९) दांडियाचा सुगंध आणि गरब्याचा नाद

तुमचे घर आनंदाने आणि देवीच्या आशीर्वादाने भरून जावो.

शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

१०)देवी दुर्गाचा तेजस्वी प्रकाश

आपले जीवन आनंद, समृद्धी आणि यशाने भरून जाऊदे.

तुम्हाला धन्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण आयुष्य लाभुदे

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews