Marathi News

Navratri Festival: उद्यापासून देशभरात नवरात्रीचा उत्सव; नवरात्रीसाठी खास शुभेच्छा संदेश…

Written by:Rohit Shinde
Published:
उद्यापासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे. देशभरात या काळात मोठा उत्साह पाहायला मिळतो. यावेळी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश...
Navratri Festival: उद्यापासून देशभरात नवरात्रीचा उत्सव; नवरात्रीसाठी खास शुभेच्छा संदेश…

उद्यापासून म्हणजेच सोमवार, २२ सप्टेंबरपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे. सण-उत्सवांचा महिना जवळ आला आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. या नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती आई दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते.  देशभरात या काळात मोठा उत्साह पाहायला मिळतो. यावेळी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश…यानिमित्ताने जाणून घेऊयात…

आपल्या प्रियजनांसाठी नवरात्रीचे शुभेच्छा संदेश

शक्तीची देवता दुर्गामाता,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान
व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,
हीच देवीचरणी प्रार्थना,
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे,
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे,
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी
तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो,
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृ शक्तीचा वास राहो,
संकटांचा नाश होवो,
प्रत्येक घरात सुख-शांती नांदो,
नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जावो,
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
२०२५ च्या नवरात्री उत्सवात खरंतर एक दुर्मिळ योगायोग चालून आला आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही देशभरात नवरात्राचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. पण यावेळी एक विशेष गोष्ट आहे: हा सण ९ ऐवजी १० दिवस चालेल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, तृतीया तिथी दोन दिवस चालेल, ज्यामुळे नवरात्रात एक दिवस वाढ होईल.

२२ सप्टेंंबरपासून नवरात्री उत्सवाची सुरूवात

आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी सोमवारी 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 01 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी रात्री 02 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर पासून होईल. याच दिवशी घटस्थापना करून दुर्गा देवीच्या पूजेला सुरुवात केली जाईल.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews