नवरात्र उत्सव देशभर खूप आनंदात साजरा केला जातो. यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून (Navratri Special) सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीला नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यावेळी नऊ दिवस दुर्गामातेची नऊ वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. या नऊ रुपांबाबत आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
दुर्गामातेची 9 रुपे कोणती?? (Navratri Special)
माता शैलपुत्री –
पहिल्या नवरात्रीत माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हे दुर्गेचे पहिले रूप मानले जाते. माँ शैलपुत्री चंद्राच्या दशा नियंत्रित करते. माता शैलपुत्रीच्या उपासनेने चंद्राचे दोष दूर होतात.
माता ब्रह्मचारिणी –
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. माता ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप मानले जाते. ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेने मंगल दोष दूर होतात.
माता चंद्रघंटा –
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गेचे तिसरे रूप माता चंद्रघंटाची पूजा केली जाते. माता चंद्रघंटा शुक्र ग्रहावर नियंत्रण ठेवते. त्यांची पूजा केल्याने शुक्र ग्रहाचे दोष दूर होतात. (Navratri Special)
माता कुष्मांडा –
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते. माता कुष्मांडा हे माँ दुर्गेचे चौथे रूप आहे, मातेचे हे रूप सूर्याची स्थिती नियंत्रित करते, कुष्मांडा मातेची उपासना केल्याने सूर्याच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण होते.
आई स्कंदमाता –
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी, माँ दुर्गेचे पाचवे रूप देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. मातेचे हे रूप बुध ग्रहावर नियंत्रण ठेवते. स्कंदमातेच्या उपासनेने बुध ग्रहाचे दोष दूर होतात.
माता कात्यायनी –
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते. मातेचे हे रूप बृहस्पतिच्या दशा नियंत्रित करते. कात्यायनी मातेची पूजा केल्याने बृहस्पतिचे दोष दूर होतात.
माता कालरात्री –
नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. माँ दुर्गेचे हे रूप शनीची दशा नियंत्रित करते. कालरात्रीची पूजा केल्याने शनिदेवाचे दोष दूर होतात.
माता महागौरी –
नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते. माँ दुर्गेचे हे रूप राहूच्या दशा नियंत्रित करते. महागौरी माता पूजनाने राहू दोष दूर होतो.
माता सिद्धिदात्री –
नवरात्रीच्या 9व्या दिवशी माँ दुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. मातेचे हे रूप केतूच्या दशा नियंत्रित करते. सिद्धिदात्री मातेची पूजा केल्याने केतू दोष दूर होतो.
नवरात्र उत्सव इतिहास – Navratri Special
नवरात्र उत्सवाचा काळ अतिशय पवित्र मानला जातो. या 9 दिवसाच्या काळात आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करतो. या पूजेशी संबंधित अनेक पौराणिक कथा आजवर प्रसिद्ध झाल्या आहेत. आज आपण यातीलच एका लोकप्रिय पौराणिक कथेची माहिती जाणून घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार, महिषासुर राक्षसाला भगवान ब्रह्मदेवाकडून अमरत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू मनुष्य, राक्षस किंवा देव यांच्यामुळे होऊ शकत नव्हता. महिषासुरने आपल्याला वरदान प्राप्त झाल्यानंतर सगळीकडे विनाश करण्यास सुरूवात केली. तसेच, लोकांचा आणि देवांचा छळ सुरू केला.
महिषासुरने सुरू केलेल्या या विनाशाला थांबवण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आदिशक्तीला आवाहन केले. त्यानंतर, महिषासुराचा वध करण्यासाठी देवी दुर्गाचा जन्म झाला. त्यामुळे तिचे नाव महिषासुर मर्दिनी असे पडले. पुढे, देवी देवतांकडून महिषासुर मर्दिनी देवीला शस्त्रांचे आणि शक्तीचे बळ देण्यात आले. हे बळ मिळताच देवीने महिषासुराशी युद्ध पुकारले. महिषासुर आणि देवीचे हे युद्ध तब्बल 9 दिवस चालले. अखेर 10 व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. तेव्हापासून ते आजवर 9 दिवस नवरात्रोत्सव साजरी केला जातो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्ल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






