हिंदू धर्मात हनुमानाला ब्रह्मचारी म्हटलं जातं…. हनुमान हे शक्ती बळ आणि धैर्याचे प्रतीक असलं तरी तू आयुष्यभर ब्रह्मचारीच राहिला होता. त्यामुळे हनुमानाला महिलांपासून थोडं दूरच ठेवलं जातं… परंतु आपल्या भारतात असेही एक मंदिर आहे (Navratri Special Famous Temples) जिथे चक्क देवी म्हणून हनुमानाची पूजा केली जाते. सिद्धपीठ काळे राम मंदिर असे या मंदिराचे नाव असून ते उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे आहे. हे मंदिर त्याच्या असाधारण शक्ती आणि बहुमुखी स्वभावाचे प्रतीक आहे.
२००० वर्षे जुनी मूर्ती आहे- Navratri Special Famous Temples
या प्राचीन मंदिरात भगवान हनुमानाची जवळजवळ २००० वर्षे जुनी मूर्ती आहे. या हनुमानाला साडी नेसवली आहे आणि देवीच्या रूपात सजवले आहे. हनुमानाचे भक्त त्याची आई म्हणून पूजा करतात. असे म्हटले जाते की हे मंदिर राजा विक्रमादित्य यांनी स्थापन केले होते. याबाबत अशी आख्यायिका आहे की, लंका जिंकल्यानंतर, माता सीतेने हनुमानाला “सिंहाचे” रूप देऊन आशीर्वाद दिला आणि वचन दिले की भविष्यात काही ठिकाणी लोक त्यांची देवी म्हणून पूजा करतील.या आशीर्वादामुळे, हनुमान अयोध्येतील या मंदिरात “देवी हनुमान” म्हणून विराजमान झाला आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की या रूपात, देवी दुर्गाप्रमाणे, तो आपल्या भक्तांचे रक्षण करतो आणि त्यांना शक्ती आणि आशीर्वाद देतो. खास करून नवरात्र आणि विशेष प्रसंगी, या ठिकाणी मोठी गर्दी होते. Navratri Special Famous Temples
देवीच्या रूपाची आख्यायिका
मंदिराचे महत्त्व अहिरावणाच्या वधाच्या कथेशी देखील जोडलेले आहे. आख्यायिकेनुसार, अहिरावणाने भगवान राम आणि लक्ष्मण यांना पाताळात घेऊन जाण्याची आणि देवीला अर्पण करण्याची योजना आखली होती. त्यावेळी हनुमानजींनी देवीचे रूप धारण केले आणि अहिरावणाचा वध केला. असे म्हटले जाते की हनुमानाने आपल्या डाव्या पायाने अहिरावणाला चिरडून त्याचे जीवन संपवले. तेव्हापासून, हनुमानजींनी पाताळावर विजय मिळवताना देवीचे रूप धारण केले होते आणि या मंदिरात त्या रूपाची पूजा केली जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





