Never Donate These Things To Kinnar: लोकमान्यतेनुसार किन्नरांमध्ये असीम शक्ती असत आणि जर त्यांनी कोणाला मनापासून आशीर्वाद दिला तर त्या व्यक्तीचं नशीब पालटतं. याच कारणास्तव सर्व शुभ प्रसंगी, जर किन्नर काही मागण्यासाठी आले तर लोक त्यांना कधीही निराश करत नाहीत. उलट ते त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या क्षमतेनुसार पैसे, अन्न आणि कपडे देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात.
तुम्हीही कधी ना कधी किन्नरांना काही दान दिलं असेल. मात्र किन्नरांना दिलेलं कोणतं दान शुभ आणि कोणतं दान दुर्भाग्य बनून येतं हे माहीत आहे का ? किन्नरांशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया.
१ तिजोरीत ठेवा ते नाणं…
अनेकदा लोकांची इच्छा असते की किन्नरांकडून त्यांना एक लकी नाणं मिळावं. अनेकदा काही जण यासाठी किन्नरांवर दबाव निर्माण करतात. मात्र किन्नरांकडून मिळालेल्या नाण्याचा शुभ प्रभाव त्यांनी स्वत:च्या इच्छेने दिला तरच होतोय हिंदू मान्यतेनुसार, किन्नरांकडून मिळालेलं नाणं तिजोरीत ठेवणं गुडलक ठरतं. आणि कधीच पैशांची कमतरता भासत नाही.
२ ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या पुत्रिकेत बुध ग्रह कमकुवत असेल आणि याचा परिणाम करिअर-व्यवसायावर होत असेल तर त्या व्यक्तीने बुधवारी किन्नरांना हिरव्या रंगाचे कपडे, हिरव्या रंगाचं फळ आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि पैसे आदी दान करा. मान्यतेनुसार, बुधवारी किन्नरांना दान बुधाशी संबंधित दोष दूर करतो आणि शुभ लाभ मिळतो.
३ जर तुमच्या घरातील मंगल कार्यांमध्ये अडथळा येत असेल तर बुधवारी एखाद्या किन्नरच्या ढोलकीची पूजा करून आपल्या श्रद्धेनुसार दान करू शकता. मान्यतेनुसार, किन्नरांच्या आशीर्वादाने शुभकार्यामधून बाधा दूर होईव आणि शुभ कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील.
४ किन्नरांना कधीच या गोष्टीचं दान करू नका…
किन्नरांना पैसे, वस्त्र आणि अन्न दान केल्याने पुण्य लाभतं, तर काही गोष्टी दान केल्याने पाप लागू शकतं. हिंदू मान्यतेनुसार, कधीही चुकूनही किन्नरांना स्वत: घातलेले किंवा मृत व्यक्तीचे कपडे किंवा वापरलेल्या दागिने (श्रृगांरासंबंधित गोष्टी) दान करू नये, याशिवाय किन्नरांना कधीही शिल्लक राहिलेलं अन्न, उष्टवलेलं अन्न दान करू नये. लोकमान्यतेनुसार, झाडू, तेल, प्लास्टिकची भाडी आदी देणं टाळा.
५ एखादा किन्नर तुमच्या दारात आला किंवा तुम्हाला कोणत्याही चौकात भेटला तर त्यांची चेष्टा करू नका किंवा त्यांना काहीही देताना त्यांचा अपमान करू नका. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही त्यांना योग्य आदर आणि सन्मान द्याल तेव्हाच तुम्हाला त्याचे विशेष आशीर्वाद मिळतात.
(टिप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आणि अध्यात्मिक साधनांवर आधारीत आहे. यामध्ये कोणतेही वैयक्तिक दावे अथवा हेतू नाहीत.)





