Marathi News

Lalbaug raja Darshan: गणेशभक्तांसाठी महत्वाची बातमी, VIP पास नको, पैसे नको…आता लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी फक्त एकच अट!

Written by:Rohit Shinde
Published:
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास किंवा विशेष पास मिळत असल्याचं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर सावधान...
Lalbaug raja Darshan: गणेशभक्तांसाठी महत्वाची बातमी, VIP पास नको, पैसे नको…आता लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी फक्त एकच अट!

राज्यात हळूहळू गणेशोत्सवाचा उत्साह निर्माण होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सावधान करणारी मोठी बातमी समोर येत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास किंवा विशेष पास मिळत असल्याचं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर सावधान… कारण सोशल मीडियात असे अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दावा केला जात आहे की, लालबागच्या राज्च्या दर्शनासाठी व्हीआयपी पास मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अशा प्रकारचा कोणताही व्हीआयपी पास किंवा विशेष पास दिला जात नाही.

लालबाग राजा मंडळाची अधिकृत भूमिका

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आपल्या सोशल मीडिया हॅण्डल्सवर या सोशल मीडियातील पोस्टचे खंडण करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या पोस्टमध्ये म्हटलं, “लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे VIP दर्शन, विशेष पासेस किंवा शुल्क आकारत नाही. सोशल मीडिया व काही वेबसाइट्सवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. कृपया अशा अफवांपासून सावध राहा. फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा. फक्त अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. सत्य माहितीसाठी आमच्या अधिकृत चॅनेल्सला भेट द्या.”

बाप्पाच्या दर्शनासाठी फक्त श्रध्देची गरज

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे पास किंवा व्हीआयपी दर्शन उपलब्ध नाहीये. तुम्हाला आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी केवळ एकच अट आहे. ही अट म्हणजे तुमच्या मनात बाप्पाबद्दलची श्रद्धा… याशिवाय कुठलीही अट मंडळाने भक्तांसमोर ठेवलेली नाहीये. तुम्ही श्रद्धेने बाप्पा जवळ या आणि बाप्पाचे आशीर्वाद घ्या. दर्शनासाठी प्रत्यक्ष मंडपात जाणे शक्य होत नसेल किंवा इतर काही कारणास्तव तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन घेता येत नसेल तर काळजी करु नका. गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी थेट प्रक्षेपण सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येत असते.

https://youtube.com/@LalbaugRaja या लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत यूट्यूबवर किंवा अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला थेट प्रक्षेपणाची लिंक उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्ही घर बसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकणार आहात…

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews