Paryushan Parv 2025: पर्युषण पर्व काय आहे? जैन समाज यादरम्यान नेमकं काय करतो?

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
हिंदू धर्मात ज्या प्रकारे नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाते. या कालावधीत नियमांचं पालन करीत, भाविक उपवास ठेवतात, देवीची आराधना करतात, त्याचप्रकारे जैन धर्मात आठ दिवसीय पर्युषण पर्व साजरा केला जातो.
Paryushan Parv 2025: पर्युषण पर्व काय आहे? जैन समाज यादरम्यान नेमकं काय करतो?

Paryushan Parv 2025: हिंदू धर्मात ज्या प्रकारे नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाते. या कालावधीत नियमांचं पालन करीत, भाविक उपवास ठेवतात, देवीची आराधना करतात, त्याचप्रकारे जैन धर्मात आठ दिवसीय पर्युषण पर्व साजरा केला जातो. जैन धर्मात दोन संप्रदाय मानणारे लोक आहेत.

श्र्वेतांबर संप्रदायात २१ ऑगस्ट ते २८ ऑगस्टपर्यंत पर्युषण पर्व असेल, तर दिगंबर संप्रदायात २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत पर्युषण पर्व साजरा केला जाईल. जाणून घेऊया काय आहे पर्युषण पर्व, पर्युषण पर्वाच्या काळात नेमकं काय घडतं?

पर्युषण पर्व काय आहे? l What is Paryushan Parv? 

पर्युषण पर्वाच्या काळात मत्सर, वाद, अहंकारापासून लांब राहून तप आणि त्याग केला जातो. पर्युषण पर्वाचा उद्देश आत्म्याची शुद्धी करणं आहे. अशी मान्यता आहे की, या पर्वादरम्यान लोक आपल्या पापांपासून दूर जाण्यासाठी आणि यापासून मुक्ती मिळविण्यासाठी ध्यान, उपवास, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात आणि आपल्या पापांसाठी क्षमा मागतात. या कालावधीत महावीर स्वामींनी दिलेल्या शिकवणीचं पालन करतात.

श्र्वेतांबर आणि दिगंबर संप्रदाय पर्युषण पर्व वेगवेगळा करतात साजरा…

श्र्वेतांबर समाज आठ दिवसांपर्यंत पर्युषण पर्व साजरा करतात, ज्याला अष्टान्हिका म्हटलं जातं. तर दिगंबर दहा दिवसांपर्यंत पर्युषण पर्व साजरा करतात, त्याला ते दसलक्षण म्हणतात.

जैन समाजातील दासलक्षण काय आहे?

उत्तम क्षमा धर्म, उत्तम मार्दव धर्म, उत्तम आजर्व धर्म, उत्तम शौच धर्म, उत्तम सत्य धर्म, उत्तम संयम धर्म, उत्तम तप धर्म, उत्तम त्याग धर्म उत्तम आकिंचन धर्म, उत्तम ब्रहचर्य धर्म हे विविध प्रकारचे धर्म असतात. (सर्वोत्तम धर्म म्हणजे क्षमा, सर्वोत्तम धर्म म्हणजे दया, सर्वोत्तम धर्म म्हणजे अज्रव, सर्वोत्तम धर्म म्हणजे स्वच्छता, सर्वोत्तम धर्म म्हणजे सत्य, सर्वोत्तम धर्म म्हणजे आत्मसंयम, सर्वोत्तम धर्म म्हणजे तप, सर्वोत्तम धर्म म्हणजे त्याग, सर्वोत्तम धर्म म्हणजे दारिद्र्य आणि सर्वोत्तम धर्म म्हणजे ब्रह्मचर्य.)

आपल्यातील वाईट सवयी दूर करण्याचा काळ पर्युषण पर्व…

जैन समाजासाठी हा काळ आपल्या आयुष्याबाबत चिंतन करण्याचा आणि ज्या लोकांसोबत ते चुकीचं वागले त्यांची क्षमा मागण्याचा काळ असतो. अशी मान्यता आहे, या पर्वाची सुरुवात सहाव्या शतकात ईसा पूर्व काळात झाली होती. त्यावेळी जैन गुरू महावीर यांनी आपल्या अनुयायांनी हिंसापासून दूर राहणे आणि अध्यात्मिक शुद्धतेवर लक्ष केंद्रीत करण्याची शिकवण दिली होती. या पर्वात वाईट कामांचा नाश करीत सत्य आणि अहिंसाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देते.