Marathi News

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात तुमच्याही स्वप्नांत कावळा येतोय?? दुर्लक्ष करू नका, असतील हे संकेत

Last Updated:
जर तुमच्या स्वप्नात जर कावळा आला तर मात्र ते स्वप्न चुकूनही दुर्लक्षित करू नका .कारण कावळ्याचे रूपाने तुम्हाला वेगळेच काही संकेत मिळण्याची शक्यता असते.
Pitru Paksha 2025 : पितृपक्षात तुमच्याही स्वप्नांत कावळा येतोय?? दुर्लक्ष करू नका, असतील हे संकेत

मित्रांनो आपल्या स्वप्नात कधी काही येईल याचा काही नेम नाही. असं म्हणतात की ज्या गोष्टीचा पण जास्त विचार करतो त्या गोष्टी आपल्या स्वप्नात येतात… तर काहीजणांचं असं मत असते की, स्वप्नात आपल्या जे काही येतं, ते आपल्याला एक प्रकारे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे संकेत देत असतं. अनेकदा तुमच्या स्वप्नात वेगवेगळे प्राणी किंवा पक्षी आले असतील…. साहजिकच आपण त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करतो. परंतु मित्रांनो, सध्याचा काळ हा पितृपक्षाचा (Pitru Paksha 2025) आहे. अशा या काळात जर तुमच्या स्वप्नात जर कावळा आला तर मात्र ते स्वप्न चुकूनही दुर्लक्षित करू नका .कारण कावळ्याचे रूपाने तुम्हाला वेगळेच काही संकेत मिळण्याची शक्यता असते. कारण हिंदू धर्मात कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक मानले जाते.

1) चोचीत काहीतरी पकडलेला कावळा –

जर तुम्ही पितृपक्षात कावळा चोचीत फूल किंवा भाकरी धरून किंवा पाणी पिताना पाहिला असेल तर ते एक चांगले लक्षण आहे. ते पूर्वजांच्या आनंदाचे, इच्छा पूर्ण होण्याचे किंवा सुख आणि समृद्धीचे संकेत देते. दुसरीकडे, जर स्वप्नात कावळा रडत असेल किंवा काहीतरी चोरत असेल तर ते अशुभ असू शकते. याचा अर्थ असा की पूर्वज दुःखी आहेत किंवा घरात संकट येऊ शकते.

2) स्वप्नात कावळा उडताना पाहणे – Pitru Paksha 2025

पितृपक्षात स्वप्नात कावळा उडताना पाहणे हे घरात चांगल्या काळाची सुरुवात आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. जर तुम्ही स्वप्नात कावळा तुमच्यावर उडताना पाहिले असेल तर ते वाईट काळ संपण्याचे आणि आनंदी काळ येण्याचे प्रतीक आहे.

3) स्वप्नात कावळा पकडताना पाहणे

जर तुम्ही स्वतःला स्वप्नात कावळा पकडण्याचा प्रयत्न करताना पाहिले तर ते शुभ चिन्ह आहे. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात कावळा पडताना पाहणे म्हणजे तुम्ही अडचणींवर मात केली आहे आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराल. Pitru Paksha 2025

4) स्वप्नात मेलेला कावळा पाहणे

पितृपक्षात स्वप्नात मेलेला कावळा पाहणे अशुभ मानले जाते. हे स्वप्न पूर्वजांच्या नाराजीचे किंवा शनिदेवाच्या क्रोधाचे लक्षण असू शकते. स्वप्नात माहेर मेलेला कावळा पाणी म्हणजे येणारे काही दिवस तुमच्यावर संकटाचे असू शकतात.

6) स्वप्नात डोक्यावर बसलेला कावळा

पितृपक्षात (Pitru Paksha 2025) स्वप्नात डोक्यावर बसलेला कावळा अशुभ लक्षण मानला जातो. स्वप्नशास्त्रानुसार, हे स्वप्न शत्रूच्या नजरेचे, पैशाचा अभावाचे, आदराचा अभावाचे किंवा येणाऱ्या कोणत्याही मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते.

7) स्वप्नात खूप कावळे दिसणे

पितृपक्षात स्वप्नात खूप कावळे दिसणे हे एक शुभ संकेत आहे. जर तुम्हाला श्राद्धादरम्यान स्वप्नात खूप कावळे दिसले असतील तर याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज समाधानी आहेत, तुम्ही शत्रूवर विजय मिळवाल आणि तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा होईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews