Pitru Paksha 2025 : पितृपक्षात चुकूनही खरेदी करू नका या वस्तू; अन्यथा पश्चातापाची वेळ येईल

Published:
पितृपंधरवाड्यात काही वस्तू खरेदी करणे टाळावे असे म्हटले जाते. कारण जर पितृपक्षात या वस्तू खरेदी केल्या तर कुटुंबावर पितृदोषाचा धोका निर्माण होऊ लागतो.
Pitru Paksha 2025 : पितृपक्षात चुकूनही खरेदी करू नका या वस्तू; अन्यथा पश्चातापाची वेळ येईल

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होऊन अमावास्येपर्यंत काळ म्हणजे पितृपक्ष (Pitru Paksha 2025)….. यंदाचा पितृपक्ष उद्या ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि २१ सप्टेंबरपर्यंत चालेल. 15 दिवसांच्या या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते.असे मानले जाते की पितृपक्षात पितरांना श्राद्ध अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात.  परंतु हे सगळं करत असताना पितृपंधरवाड्यात काही वस्तू खरेदी करणे टाळावे असे म्हटले जाते. कारण जर पितृपक्षात या वस्तू खरेदी केल्या तर कुटुंबावर पितृदोषाचा धोका निर्माण होऊ लागतो.

पितृपक्षात कोणकोणती खरेदी टाळावी- Pitru Paksha 2025

1) शास्त्रांनुसार, पितृपक्षाच्या काळात बूट, चप्पल आणि नवीन कपडे खरेदी करणे टाळावे.

2) पितृपक्षात सोने-चांदी खरेदी करणे सुध्दा अशुभ मानले जाते.

3) पितृ पंधरवड्यात या लग्न, साखरपुडा घराची वास्तुशांती यासारखी शुभ कामे टाळावी.

4) पितृपक्षाच्या काळात कांदा, लसूण, अंडी, मांस आणि मासे यासारखे मांसाहारी पदार्थ सेवन करण्याचेही टाळावे .

5) पितृपंधरवड्यात कोणाशी वाद घालू नये. दारू पिऊ नये. किंवा कोणताही अपशब्द वापरू नये.

6) पितृ पंधरवड्यात नवीन घर, वाहन, मालमत्ता खरेदी करू नये.

7) पितृपक्षात फ्रिज टीव्ही वॉशिंग मशीन यांसारखे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी न केलेली बरी असं म्हटलं जातं. Pitru Paksha 2025

8) पितृपक्षात स्वयंपाक घरातील मोहरीचे तेल, आणि झाडू यासारख्या वस्तूंची खरेदी करू नये अशा वस्तूंची खरेदी केल्यास त्रिदोष निर्माण होतो आणि तुमच्या कुटुंबाला मोठ्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते त्यामुळे या वस्तूंची खरेदी टाळावी.

9) पितृपक्षाच्या पंधरा दिवसात नवीन भांडी खरेदी करणे टाळावी पूजा किंवा विधी करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील जुनी भांडी किंवा ताटे वापरू शकता.

पितृदोष कसा टाळता येईल?

पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात नियमांचे पालन करा, दानधर्म करा, घरात स्वच्छता ठेवा, सात्विक आहार घ्या, तर्पण आणि श्राद्ध करा, आणि नकारात्मक कृत्यांपासून दूर राहा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews