भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होऊन अमावास्येपर्यंत काळ म्हणजे पितृपक्ष (Pitru Paksha 2025)….. यंदाचा पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि २१ सप्टेंबरपर्यंत चालेल. 15 दिवसांच्या या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते.असे मानले जाते की पितृपक्षात पितरांना श्राद्ध अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. परंतु हे सगळं करत असताना पितृपंधरवाड्यात काही गोष्टी टाळणे ही गरजेच आहे अन्यथा तुमचे पूर्वस तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते. या गोष्टी कोणताही ते सविस्तर पाहूयात
पितृपक्षात काय करू नये?? Pitru Paksha 2025
धार्मिक शास्त्रांनुसार पितृपक्षात विवाह, गृहप्रवेश, एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे अशा प्रकारचे कोणतेही शुभ कार्य करू नका.
पितृ पंधरवड्यात नवीन घर, वाहन, मालमत्ता किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळावे.
पितृपक्षात दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, सुपारी, वांगी, कांदा, पांढरे तीळ, भोपळा, मुळा, लसूण, शिळे अन्न, काळे मीठ इत्यादींचे सेवन करू नका.
पितृपक्षात बूट, चप्पल, कपडे खरेदी करण्यास निषिद्ध मानले जाते… त्यामुळे या वस्तू खरेदी करू नये.
पितर या दिवसांमध्ये पृथ्वीवर येतात असे मानले जाते, म्हणून या काळात तामासिक पदार्थांचे सेवन टाळावे.
पितृपक्षात, भिकाऱ्यांचा अपमान करू नका, तुमच्या दारात कुत्रा जरी आला तरी त्याला हाकलून देऊ नका.
पितृपक्षात मोहरीचे तेल घरी आणू नये. मिठाप्रमाणेच शेजाऱ्यांकडून मोहरीचे तेल देखील घेऊ नये. मोहरीच्या तेलात शनि ग्रह असल्याने व्यक्तीची दृष्टी कमी होऊ शकते
पितृदोष कसा टाळता येईल?
पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात नियमांचे पालन करा, दानधर्म करा, घरात स्वच्छता ठेवा, सात्विक आहार घ्या, तर्पण आणि श्राद्ध करा, आणि नकारात्मक कृत्यांपासून दूर राहा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





