Pitru Paksha 2025 : पितृपक्षात तुळशीची पूजा करावी की नाही?? चला सविस्तर जाणून घेऊया

Published:
Last Updated:
असे मानले जाते की तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने पूर्वजांना मोक्ष मिळतो
Pitru Paksha 2025 : पितृपक्षात तुळशीची पूजा करावी की नाही?? चला सविस्तर जाणून घेऊया

सध्याचा काळ हा पितृपक्षाचा (Pitru Paksha 2025) आहे…7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर अशा या 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते. पितृपंधरवाड्यात अनेक महत्वाची कामे करण्यास मनाई केली जाते. पितृपक्षात लसूण आणि कांदा असणारे पदार्थ खाऊ नये अस बोलले जाते, चप्पल किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करू नये असे सांगितले जाते…. अशावेळी पितृपक्षात तुळशी माताची पूजा केली तर चालते का?? हे तुम्हांला माहितेय का?? चला तर आम्ही तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो….

तर मित्रानो, पितृपक्षात तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने पूर्वजांना फक्त मोक्ष मिळतो अस नाही तर नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात.

अशी करा तुळशीची पूजा – Pitru Paksha 2025

पितृपक्षात दररोज तुळशीची पूजा करा आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा आणि तुळशीची प्रदक्षिणा करा. आता तुळशी मातेजवळ उभे राहून तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा आणि सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. तुम्ही दूध, पाणी किंवा गंगाजलात टाकून पूर्वजांना तुळशीची पाने देखील अर्पण करू शकता. असे केल्याने पूर्वज संतुष्ट होतात आणि तुम्हांला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात.

तुळशीपूजनाच्या वेळी, तुम्ही तुळशी चालीसा म्हणू शकता तसेच इतरही काही मंत्र म्हणू शकता. हे मंत्र म्हटल्याने तुमच्या जीवनात समृद्धी सुख आणि शांती प्राप्त होईल तसेच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची ही शक्यता आहे. (Pitru Paksha 2025)

कोणते मंत्र म्हणाल??

देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः
नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।।
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

तुलसी नामाष्टक मंत्र –

वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही