Marathi News

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात करा या मंत्रांचा जप; तुम्हालाही मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद

Published:
पूर्वजांची पूजा करण्यासोबतच, विशेष मंत्रांचा जप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते.
Pitru Paksha 2025 : पितृपक्षात करा या मंत्रांचा जप; तुम्हालाही मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद

सध्याचा काळ हा पितृपक्षाचा (Pitru Paksha 2025) आहे…7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर अशा या 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते. पितृपक्षाचा सर्वात मोठा उद्देश हाच असतो की आपल्या पूर्वजांना प्रसन्न करणे आणि त्यांचे आशीर्वाद मिळवणे आहे. या काळात, पूर्वजांची पूजा करण्यासोबतच, विशेष मंत्रांचा जप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती येते.

या मंत्राचा करा जप – Pitru Paksha 2025

पितृ तर्पण मंत्र
ॐ पितृभ्यः स्वधा नमः।

पितृ शांति मंत्र
ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

श्राद्ध मंत्र
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः।पितृ दोष निवारण मंत्रॐ सर्व पितृ देवताभ्यो नमः।

गायत्री पितृ दोष निवारण मंत्र
ॐ देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च।नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः।

पितृपक्षाच्या मंत्रांचे जप करण्याचे फायदे

१) मंत्रांचा जप केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना आनंद मिळतो. यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

२) या मंत्रांचा जप तुमच्या घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा आणते. तुमच्या शरीरातील सर्व ताण निघून जाईल आणि तुमचे मन शांत राहते.

३) अनेकदा पितृदोष जन्मामुळे किंवा पूर्वजांच्या कर्मांमुळे येतो, ज्यामुळे जीवनात अडथळे, येतात. परंतु वरील मंत्रांचा जप केल्याने हे दोष कमी होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात. (Pitru Paksha 2025)

४) नियमित मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनाला शांती तरी मिळतेच याशिवाय तुमची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते. मनाची एकाग्रता वाढते आणि जीवनाचा योग्य मार्ग अवलंबण्याची प्रेरणा मिळते.

५) पितृपक्षाच्या वरील मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या कामात तर यश मिळतेच तसेच तुमची आर्थिक भरभराट होऊ शकते. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक वातावरण कायमचे निघून जाऊ शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews