Pitru Paksha 2025 Rashi Bhavishya: आजपासून पितृपक्षाला सुरुवात!! या 3 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

Published:
Last Updated:
यंदाच्या पितृपक्षात नवपंचम राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाचा फायदा सिंह, कुंभ आणि मीन या तीन राशींना होणार आहे.
Pitru Paksha 2025 Rashi Bhavishya: आजपासून पितृपक्षाला सुरुवात!! या 3 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

आज 7 सप्टेंबर पासून पितृ पक्षाला सुरुवात होत आहे…. 7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर अशा या 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की पितृपक्षात पितरांना श्राद्ध अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. यंदाच्या पितृपक्षात नवपंचम राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाचा फायदा सिंह, कुंभ आणि मीन या तीन राशींना होणार आहे. या राशींच्या लोकांच्या (Pitru Paksha 2025 Rashi Bhavishya) जीवनात मोठे बदल घडताना पाहायला मिळू शकतात.

सिंह रास – Pitru Paksha 2025 Rashi Bhavishya

सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम संयोजन अत्यंत अनुकूल असेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचा पगार वाढ ही होईल. तुम्ही व्यावसायिक असाल तर पितृपक्षात तुमचा व्यवसाय आणखी वाढण्याची आणि मजबूत होण्याची शक्यता आहे. पैसे कमवण्यासाठी इतरही अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. घरातील वातावरण ही अत्यंत सकारात्मक राहील आणि कौटुंबिक गोडवा वाढेल. याच काळात नवनवीन मित्र मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ –

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग सुखाचा आणि आनंदाचा नवीन दरवाजा उघडेल. जर तुम्ही कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली असेल तर यातून तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंद लाभेल. या काळात अध्यात्म आणि धर्माकडे तुमचा कल वाढेल. काही पुस्तके वाचाल . नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगलं राहील. वरिष्ठाकडून मानसन्मान मिळेल. (Pitru Paksha 2025 Rashi Bhavishya)

3) मीन

ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, मीन राशीच्या लोकांना या नवपंचम योगाचा विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठबळ मिळेल. जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर या पितृ पक्षाच्या काळात मोठा नफा मिळेल. प्रेम संबंधातील अडथळे दूर होतील, तुमचं लग्न झालं असेल तर पत्नीसोबतच्या नात्यातील गोडवा वाढेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. शक्यतो बाहेर एखाद्या प्रवासाचा योग येऊ शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)