7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण रात्री 9:57 वाजता सुरू होऊन पहाटे 1:26 वाजता संपेल. भारतात हे ग्रहण दिसणार असल्याने सूतक कालदेखील लागू असेल. दुपारी 12:58 वाजल्यापासून सूतकाची सुरुवात होईल. वैदिक परंपरेनुसार, या काळात विशेषतः गर्भवती महिलांनी काही नियम पाळावेत असं सांगितलं जातं.
गर्भवती महिलांनी ‘हे’ नियम पाळावेत
ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी मंत्रजप, प्रार्थना आणि धार्मिक स्मरण करणं शुभ मानलं जातं. हनुमान चालीसा किंवा इतर धार्मिक स्तोत्रांचं पठण केल्याने नकारात्मक परिणाम टळतात, अशी धारणा आहे. याचबरोबर शांत मनाने ध्यान, भजन किंवा कीर्तन केल्यास आईसोबत बाळालाही मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतो. ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी मंत्रजप, प्रार्थना आणि धार्मिक स्मरण करणं शुभ मानलं जातं. श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत.
तुळशीची पानं हातात ठेवणं हे देखील महत्त्वाचं मानलं जातं. तुळस संरक्षणाचं प्रतीक असल्याने ती नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते. त्याचप्रमाणे डोकं आणि पोट कपड्याने झाकून ठेवण्याचीही प्रथा आहे. ग्रहण संपल्यानंतर गंगाजलाने स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करण्याचं महत्व अधोरेखित केलं जातं. याशिवाय, ग्रहणाच्या काळात सकारात्मक विचार करणं, धार्मिक ग्रंथ वाचणं आणि चांगल्या गोष्टींवर मन केंद्रित करणं हे देखील लाभदायी मानलं जातं. यामुळे आई-बाळाच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर चांगला परिणाम होतो.
हे उपाय श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत. वैद्यकीय दृष्टिकोनातून काही शंका असल्यास गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरेल.
भारतातील कोणत्या शहरातून ग्रहण दिसणार?
हवामान स्वच्छ असल्यास भारतातील या 15 शहरांमध्ये चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, लखनौ, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना, भोपाळ आणि भुवनेश्वर. कोलकाता, गुवाहाटी सारख्या पूर्व भारतात चंद्रोदय लवकर झाल्यामुळे ग्रहणाची सुरुवात अधिक स्पष्टपणे पाहता येते. त्याच वेळी, मुंबई आणि अहमदाबाद सारख्या पश्चिम भारतात ग्रहण पूर्णपणे दिसेल, परंतु चंद्रोदयाची वेळ थोडी उशिरा असेल. हिंदू मान्यतेनुसार, सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या 9 तास आधी सुरू होईल.
चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पहावे की नाही? ग्रहण असं उघड्या डोळ्यांनी पाहणे अशुभ मानले जाते पण नक्की यामागे काय सत्य आहे जाणून घेऊयात. विज्ञानानुसार चंद्रग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. तसेच उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहण्यात काहीही नुकसान नाही तसेच ते सूर्यग्रहणापेक्षा वेगळे असते. चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची किंवा संरक्षक फिल्टरची आवश्यकता नसते आणि चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतो.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.





