सध्याचा काळ हा पितृपक्षाचा आहे…7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर अशा या 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले जाते. पितृपंधरवाड्यात नवीन गाडी खरेदी करू नये, शुभकार्य करू नये, नवीन प्रॉपर्टी खरेदी करू नये असं बोललं जातं परंतु या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?? चिंता करू नका प्रेमानंद महाराजांनी (Premanand Maharaj) याबद्दल आपल्या भक्तांना योग्य ते मार्गदर्शन केलं आहे….
प्रेमानंद महाराजांचे देशभरात लाखो चाहते Premanand Maharaj
वृंदावनातील केळीकुंज नावाच्या ठिकाणी राहत असलेले प्रेमानंद महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग देशात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली, भोजपुरी सुपरस्टार रवी किशन, कुस्तीगीर द ग्रेट खली याच्यासह देशभरातील अनेक दिग्गज लोक प्रेमानंद महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेताना आपण बघितले आहेत. सोशल मीडियावर सुद्धा प्रेमानंद महाराजांची विचार लोकांपर्यंत पोहोचत असतात. भक्त जे जे प्रश्न विचारतात त्याची अगदी सविस्तर उत्तरे प्रेमानंद महाराज देत असतात आणि ते सत्संगाद्वारे लोकांना योग्य दिशा दाखवतात. प्रेमानंद महाराजांच्या अनुयायांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
हे ही वाचा
पितृपक्षा बद्दल काय म्हणतात प्रेमानंद महाराज??
सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भक्त त्यांना विचारत आहे की पितृपक्षात नवीन वस्तू का खरेदी करू नयेत. त्यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) म्हणतात, पितृ पक्षात नवीन वस्तू खरेदी करणे आणि सेवन करणे आपल्या पूर्वजांपासून आपले लक्ष विचलित करते आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना त्रास होतो. पितृपक्षात खरेदी केलेल्या वस्तू आपल्या पूर्वजांना समर्पित असतात. त्यामुळे त्या वस्तूंमध्ये पितरांचा समावेश असतो आणि या वस्तू जिवंत लोकांसाठी वापरणे योग्य नाही. यामुळेच लग्न, ज्वेलर्स, कार मार्केट, बांधकाम व्यवसाय इत्यादींशी संबंधित लोक पितृपक्षात निवांत राहतात….. या काळात व्यवसाय सुद्धा कमीच असतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)