Rashi Bhavishya: 15 सप्टेंबरनंतर भद्र महापुरुष राजयोग; या 4 राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार

Published:
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला सर्व ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो राशीत प्रवेश करतो तेव्हा तो व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम करतो.
Rashi Bhavishya: 15 सप्टेंबरनंतर भद्र महापुरुष राजयोग; या 4 राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार

आपल्या भारतात राशिभविष्याला (Rashi Bhavishya) लोकं खूपच कुतूहलाने नही बघतात. आपल्या राशिभविष्य काय आहे हे बघण्याचे उत्सुकता अनेकांना असते. वेगवेगळ्या ग्रहांच्या संक्रमणानुसार लोकांच्या राशिभविष्यामध्येही मोठा फरक पडतो. येत्या१५ सप्टेंबर २०२५ रोजी बुध ग्रह सिंह राशी सोडून कन्या राशीत जात आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला सर्व ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो राशीत प्रवेश करतो तेव्हा तो व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम करतो. सध्या बुध ग्रह सिंह राशी सोडून कन्या राशीत गेल्याने 4 राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे.

वृषभ रास – Rashi Bhavishya

वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये बुध राशीच्या संक्रमणामुळे यश आले आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबर नंतर तुम्हाला आर्थिक धनलाभ होऊ शकतो. साहजिकच तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक राहील. तुमची काही कामे अडकली असतील तर ती 15 सप्टेंबर नंतर पूर्ण होऊ शकतात. कोणते टेन्शन असेल तर ते सुद्धा दूर होईल.

मिथुन रास – Rashi Bhavishya 

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध राशीचे संक्रमण अनुकूल मानले जाते. त्यामुळे 15 सप्टेंबर नंतर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग उघडतील. सर तुम्ही कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली असेल तर या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे (Rashi Bhavishya) . समाजात चार चौघात तुम्हाला मान सन्मान मिळेल. आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या 15 सप्टेंबर नंतरच दूर होऊ शकतात.  बुध राशीच्या संक्रमणामुळे तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होऊ शकतात.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना बुध संक्रमणामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. खास करून जर तुम्ही व्यवसायिक असाल तर अचानकपणे नवनवीन कामे मिळू शकतात. नवीन मित्र मिळण्याची संधी आहे. कौटुंबिक वातावरण अत्यंत सकारात्मक राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.

धनु रास –

धनु राशीच्या लोकांसाठी, बुध संक्रमणामुळे नोकरी आणि व्यवसाय दोन्हीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. साहजिकच आर्थिक लाभ आणि भरभराट होईल. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर करिअर मध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.  तुमचे आरोग्य चांगले राहील. मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत बाहेर फिरण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews