वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, (Rashi Bhavishya)देवांचा गुरु बृहस्पती जेव्हा एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो तेव्हा अनेक राशींवर मोठा परिणाम होतो. यंदा, शारदीय नवरात्रीत, देवांचा गुरु बृहस्पती हा राक्षसांचा गुरु शुक्राशी संयोग करून अर्धकेंद्र योग तयार करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५:१६ वाजता, गुरू आणि शुक्र एकमेकांपासून ४५ अंशांवर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. ज्यामुळे तीन राशींना विशेष फायदे मिळू शकतात. या राशीच्या लोकांचे जणू नशीबच बदलणार आहे.
1) वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरू आणि शुक्र यांचा अर्धकेंद्र योग जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरू शकतो. जेव्हा गुरु लग्नात असतो आणि बुध चौथ्या घरात असतो तेव्हा जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. वृषभ राशींच्या लोकांच्या घरात सकारात्मक वातावरण राहील. वैवाहिक जीवन आणि प्रेम प्रकरणांमध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. २५ सप्टेंबर नंतर नवीन मालमत्ता किंवा जमीन खरेदी करण्याची संधी मिळेल. तुम्ही जर नोकरदार असाल तर कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजामध्ये मानसन्मान आणि आदर मिळेल. अनेक दिवसापासून रखडलेली कामे 25 सप्टेंबर नंतर पूर्ण होऊ शकतात. (Rashi Bhavishya)
2) सिंह रास (Rashi Bhavishya)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरुचा अर्धकेंद्र योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. शुक्र सध्या लग्नात आहे, ज्यामुळे शुभ परिणाम मिळतील. या योगाच्या प्रभावाखाली, व्यक्तींना जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात यश मिळविण्याची क्षमता असेल. जर काही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर ते तुम्ही 25 सप्टेंबर नंतर घेऊ शकता. तुमचं नशीब इतक्या जोरावर असेल की जिथे लाथ माराल तिथे पाणी काढण्याची क्षमता आहे. साहजिकच तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता ही वाढेल. (Rashi Bhavishya)
3) धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्र यांचा अर्धकेंद्र योग अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ ठरू शकतो. 25 सप्टेंबर नंतर तुम्हाला नवनवीन संधी मिळू शकतात. विशेषतः विद्यार्थी आणि नोकरदार वर्गांसाठी 25 सप्टेंबर नंतरचा काळ अतिशय अनुकूल आणि यशस्वी ठरेल. तुमची जी काही कामे रखडली असतील तर ती पूर्ण होतील. कोर्ट कचेरीच्या बाबतीत काय असेल तर तिथेही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नवनवीन मित्रांना भेटण्याचा आणि बाहेरी फिरण्याचा योग जुळून येईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





