Rashi Bhavishya : मंगळाचा मकर राशीत प्रवेश; या ३ राशींनी घ्यावी विशेष काळजी

Published:
१६ जानेवारी रोजी साहस, ऊर्जा आणि पराक्रमाचा ग्रह मंगळ मकर राशीत प्रवेश करणार आहे. या काळात ‘रुचक योग’ तयार होत असून काही राशींसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो, तर काही राशींना मात्र अधिक सतर्क राहण्याची गरज आहे
Rashi Bhavishya : मंगळाचा मकर राशीत प्रवेश; या ३ राशींनी घ्यावी विशेष काळजी

Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशीबदलाला अत्यंत महत्त्व दिले जाते. एखादा प्रमुख ग्रह जेव्हा संक्रमण करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनातील विविध क्षेत्रांवर दिसून येतो. १६ जानेवारी रोजी साहस, ऊर्जा आणि पराक्रमाचा ग्रह मंगळ मकर राशीत प्रवेश करणार आहे. या काळात ‘रुचक योग’ तयार होत असून काही राशींसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो, तर काही राशींना मात्र अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगावी.

वृषभ राशी (Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे संक्रमण आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण करू शकते. अनावश्यक प्रवास टाळावा, कारण अपघात किंवा पैशाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बोलताना संयम ठेवा, अन्यथा तयार कामेही बिघडू शकतात.

कन्या राशी

कन्या राशीमध्ये मंगळ पाचव्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे निर्णयक्षमता प्रभावित होऊ शकते. विशेषतः नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी अधिक सावध राहणे गरजेचे आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. Rashi Bhavishya

कर्क राशी

कर्क राशीसाठी मंगळ सातव्या भावात भ्रमण करणार आहे. कर्क राशी स्वभावाने सौम्य असल्याने मंगळाची उग्र ऊर्जा तणाव वाढवू शकते. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता असून, किरकोळ विषय मोठ्या भांडणात बदलू शकतो. त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)