आपल्या भारतात राशिभविष्य (Rashi Bhavishya) बद्दल लोकांना खूप उत्सुकता असते वेगवेगळ्या खगोलीय घटनांचा प्रभाव आपल्या राशींवर पडतो आणि लोकांच्या राशिभविष्यात वेगळे बदल होतात असं बोललं जाते. … आपण सूर्य देवाला खूप महत्त्व देतो. सूर्याला ग्रहांचा राजाही बोलले जाते. वैदिक पंचांगानुसार, ज्याप्रमाणे सूर्य वेळोवेळी आपली राशी बदलतो, त्याचप्रमाणे सूर्याचे नक्षत्र ही बदलते. कालपासून सूर्याने उत्तराफाल्गुनी नक्षत्रात भ्रमण केलं आहे. उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी स्वतः सूर्य आहे. अशावेळी सूर्याचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश मेष ते मीन राशींपर्यंतच्या राशींवर परिणाम करेल. उत्तराफाल्गुनी नक्षत्रात सूर्याचे भ्रमण अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल. या राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टीने इथून पुढचा काळ हा फक्त आणि फक्त तुमच्याच असेल. याशिवाय कौटुंबिक संवाद ही चांगला राहील.
1) मेष – Rashi Bhavishya
सूर्य नक्षत्र संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याकाळात मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवी उमेद, सुख समृद्धी आणि शांती नांदेल… आर्थिक भरभराट होईल…. सर तुमचं लग्न झालं नसेल तर या काळात तुम्हाला लग्नासाठीचे नवनवीन प्रस्तावित येऊ शकतात . जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढीसाठी इथून पुढचा काळ हा अतिशय सकारात्मक राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते. कौटुंबिक जीवनातील समस्या संपतील.
2) कर्क रास –
सूर्य नक्षत्रातील बदल कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. या काळात (Rashi Bhavishya) तुमचा आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नातलगांशी संबंध सुधारतील…. जुने मित्र भेटण्याची शक्यता असून प्रवासाची सुद्धा संधी मिळेल. प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.
3) सिंह रास –
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये पहिल्या घरात होत आहे. ज्याचा संबंध व्यक्तिमत्व, आरोग्य आणि आत्मसन्मानाशी संबंधित आहे. त्यामुळे आजपासून म्हणजे 14 सप्टेंबर पासून तुमचा आत्मविश्वास वाढेल. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मानसन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी अचानक भरती मिळण्याची शक्यता आहे.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






