Shravan Special Recipe : श्रावणात उपवासाला ट्राय करा ‘उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ’ पाहा रेसिपी…

Published:
'उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ' म्हणजे उपवासासाठी बनवलेले कुरकुरीत थालीपीठ. हे थालीपीठ साबुदाणा, बटाटा किंवा इतर उपवासाच्या पिठाचा वापर करून बनवतात. हे थालीपीठ उपवासाच्या दिवसांमध्ये एक रुचकर आणि सोपा पर्याय आहे.
Shravan Special Recipe : श्रावणात उपवासाला ट्राय करा ‘उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ’ पाहा रेसिपी…

श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित आहे. भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते, उपवास केला जातो. या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खायचं, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय. तुम्ही कधी उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ ट्राय केले का? चला तर स्पेशल उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे जाणून घेऊया.

साबुदाणा थालीपीठ

साहित्य

  • साबुदाणा  (४-५ तास भिजवलेला)
  • उकडलेले बटाटे 
  • शेंगदाणे 
  • जिरे 
  • हिरवी मिरची
  • सैंधव मीठ 
  • कोथिंबीर 
  • तेल किंवा तूप 

कृती

  • भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, शेंगदाणे, जिरे, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करून चांगले मिसळा.
  • मिश्रणातून थोडे मिश्रण घेऊन थालीपीठ थापा.
  • गरम तव्यावर थोडेसे तेल किंवा तूप घालून थालीपीठ दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरमागरम थालीपीठ दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा. 

टीप

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार थालीपीठामध्ये इतर उपवासाचे साहित्य जसे की, लाल मिरची पावडर किंवा लिंबाचा रस घालू शकता.
  • तुम्ही थालीपीठ तेलाऐवजी तुपात भाजल्यास त्याची चव अधिक चांगली लागते.
  • साबुदाणा व्यवस्थित भिजवणे महत्वाचे आहे, त्यामुळे थालीपीठ मऊ आणि चविष्ट होईल.
  • तुम्ही थालीपीठ शिजवण्यासाठी नॉन-स्टिक तवा वापरल्यास ते भाजायला सोपे जाईल.