Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, नैवेद्यासाठी बनवा तांदळाची परफेक्ट खीर

Published:
श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठीची खास स्वीट डिश
Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, नैवेद्यासाठी बनवा तांदळाची परफेक्ट खीर

सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. श्रावण महिन्यात मांसाहार करत नसल्यानं आपण शाकाहारी पदार्थांचे वेगवगळे बेत करतो. शिवाय सणावाराच्या निमित्तानं, श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नैवेद्याचं ताट सजवायचं असतं. त्यासाठी खास तांदळाची खीर कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत…

साहित्य

  • 1/2 कप तांदूळ
  • 1 लिटर दूध
  • 1/2 कप साखर
  • 1/4 चमचा वेलची पूड
  • 1/4 कप काजू, बदाम, पिस्ता (बारीक चिरलेले)

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुवून 15-20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • एका जाड पातेल्यात दूध गरम करा.
  • दूध उकळल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ घाला.
  • मंद आचेवर तांदूळ शिजवून घ्या.
  • तांदूळ पूर्णपणे शिजल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घाला.
  • गॅस मध्यम आचेवर ठेवून दूध आटवून घ्या. अधूनमधून ढवळत राहा, म्हणजे खीर खाली लागणार नाही.
  • साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा.
  • आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता इत्यादी बारीक चिरून टाका.
  • खीर थोडी घट्ट झाल्यावर गॅस बंद करा
  • गरमागरम किंवा थंड झाल्यावर सर्व्ह करा.

टीप

  • तुम्ही खीर आणखी घट्ट करण्यासाठी थोडा वेळ मंद आचेवर शिजवू शकता.
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार जायफळ पूड किंवा केशर देखील घालू शकता.
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews